आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सरकार इतक्या पैशाच करत काय ?

आनंद शितोळे

बँकांना व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा होते जी “ राखीव निधी “ म्हणून सुरक्षित ठेवली जाते.

रिझर्व्ह बँकेकडे असलेली हि गंगाजळी आहे किंवा होती ९ लाख कोटी रुपयांची. म्हणजेच हे सगळे पैसे तुम्ही आम्ही इमानइतबारे केलेल्या व्यवसायातून, बँकिंग मधून भरलेले आहेत अर्थातच करदात्यांचे पैसे आहेत. राखीव निधी हे नावच हा निधी आपत्कालीन स्थितीत वापरायचा असल्याचे स्पष्ट करत.

यशस्वी नोटाबंदी ,यशस्वी जीएसटी आणि घोडदौड करणारी अर्थव्यवस्था असताना सरकारला हे ९ लाख कोटी नेमके कशाला हवे होते ?

हि गंगाजळी देण्यास नकार दिल्याने उर्जित पटेल घरी गेले आणि इतिहासाचे पदवीधर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेम्बर २०१८ मध्ये नेमलेल्या समितीने अंतिम अहवाल दिला.
“ येत्या पाच वर्षात हे ९ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने सरकारला सुपूर्द करावेत “

धक्कादायक बाब म्हणजे हा आपत्कालीन राखीव निधी पूर्वी ६.४ टक्के होता तो घटवून ५.५ टक्के करावा अशीही शिफारस समितीने केलेली आहे.

आता रिझर्व्ह बँकेकडून सरकारने घेतलेले पैसे, रिझर्व्ह बँकेने पैसे दिलेले नाहीत, सरकारने घेतलेत हे लक्षात ठेवा.

२०१४-२०१५ – ६५८९६ कोटी
२०१५-२०१६ – ६५८७६ कोटी
२०१६-२०१७ – ३०६५९ कोटी
२०१७-२०१८ – ५०००० कोटी
२०१८-२०१९ – ९९१२२ कोटी
२०१९-२०२० – ५७१२८ कोटी
२०२०-२०२१ – ९९१२२ कोटी
२०२१-२०२२ – ३०३०७ कोटी
२०२२-२०२३ – ८७१४६ कोटी
२०२३-२०२४ – २११००० कोटी
एकूण रक्कम झाली ७९६२५६ कोटी.

मग फक्त एवढेच पैसे रिझर्व्ह बँकेकडून घेतलेत का ? तर त्याच उत्तर ‘ नाही ‘ .
रिझर्व्ह बँक सरकारला नफ्यातून डिव्हिडंड देते. त्या पैशाचा हिशोब वेगळाच.

२००६-२०१४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारने १०१६७९ कोटी रुपये घेतले.
२०१५-२०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारने ७९६२५६ कोटी रुपये म्हणजे आठ पट पैसे जास्त घेतलेत.

सरकार इतक्या पैशाच करत काय ?

इंधनाच्या उत्पादन शुल्क करातून मिळालेली रक्कम,
मद्यविक्रीमधून मिळालेले उत्पादन शुल्क,
जीएसटीची रक्कम,
वेगवेगळ्या कंपन्या विकून मिळालेली रक्कम,
विमानतळ- रेल्वे यांच्या खाजगीकरणातून मिळालेली रक्कम

एवढे लाखो कोटी रुपये नेमके कुठे गेलेत ?

लसीकरण करायला ३६००० कोटी लागणार होते,
रस्त्याची काम सगळीच बीओटी तत्वावर आहेत जिथे आपल्याला टोल भरायचा आहेच.

मग नेमके पैसे कुठे गेलेत ?

वेगवेगळ्या काळात आलेल्या आर्थिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली कारण रिझर्व्ह बँकेची त्याकाळात असलेली मजबूत स्थिती आणि २८ टक्के असलेली गंगाजळी.

आता जर असा मंदीचा फेरा आला किंवा जगभरात आर्थिक अरिष्ट आले तर भारताची अवस्था काय होईल ?

आनंद शितोळे

गंगाजळी

सीधी_बात

सबबिकजायेगा

आपल्याधडावरआपलेच_डोके

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!