20 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी BMC चे 2 अभियंता आणि 1 सामाजिक कार्यकर्ता अटकेत. – ACB मुंबई ची धडाकेबाज कामगिरी

मुंबई : मुंबई विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने 20 लाखांची मागणी करणाऱ्या पालिकेच्या दोन अभियंत्यासह तिघांना अटक केली आहे. पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी ही लाच मागितली जात होती. मंगेश कांबळी, सूरज पवार, निलेश होडार अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपी मंगेश कांबळी हा मरीन लाइन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर, तिसरा आरोपी सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करतो. तक्रारदाराच्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर निष्काषन कारवाईची नोटिस बजावण्यात आली होती. नोटिस आल्यानंतर फिर्यादी हे कांबळी आणि पवार यांना भेटण्यासाठी गेले होते.
तक्रारदाराने सुरुवातीला त्यांना 20 लाख रुपये देण्याचे मंजुर केले व या पालिकेच्या दोघांविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे 4 एप्रिल रोजी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करुन आरोपींनी रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात तिघेही आरोपी रंगेहाथ अकडले आहेत.
5 एप्रिल रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कांबळी पवार तसेच त्यांच्या वतीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून 8 लाख रुपये स्कीकारणाऱ्या होडार याला अटक केली आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत