तुफानातील दिवा अण्णाभाऊ साठे
जानराव यु एफ
अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनांनिमित्त विनम्र अभिवादन आणि प्रणाम.
अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिक या जगात शोधूनही सापडणार नाही परंतु केवळ जात आणि जातीयता जी कीड या देशाला आणि संस्कृतीला लागलेली आहे ती त्यांना मोजकं, कमी लेखण्यात कारणीभूत आहे याचा विचार आजही त्यांच्या अनुयायानी करून त्यांनी दिलेली शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनजागृती, समाजजागरण करणं आज काळाची गरज आहे ते महत्वाचं आहे.
अण्णाभाऊना येथील असभ्यतेने आयुष्यभर हैराण केलं होतं. येथील मानवतेच्या मोठया भागाला अस्पृश्य करून त्याला पशुपेक्षाही भीषण जगणे या संस्कृतीने बहाल केले होते त्यांच संस्कृतीचे, धर्माचे समर्थन आज जर त्यांचा अनुयायी (????)करत असेल तर तो अण्णाभाऊचा आणि त्यांच्या विचारांचा पराभव समजावा.या विपरीत संस्कृतीची आग आणि तिच्या झळा आपला समाज, दलित पीडित, वेशीबाहेरचा जिवंत माणूस भोगतोय ही जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी लेखणीच्या, साहित्याच्या, पोवाड्याच्या माध्यमातून जगासमोर ही विदारक स्थिती मांडली. या दिशाडोळस कलावंताने हे वास्तव समग्र साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणलं हे अत्यन्त महत्वाचं आहे. अण्णाभाऊच्या प्रतिभेचा अविष्कार लक्षणिय होता आणि तो आंबेडकरी मूल्य प्रक्रियेशी रक्ताच्या अदृश्य नात्याने बांधलेला होता हेही त्यांच्या अनुयायानी (???)ध्यानात ठेवणं आज काळाची गरज आहे कारण बौद्ध, महार आणि मांग हे खरे तर सक्खे भाऊ म्हणून शेजारीच राहतात आणि तेही गुण्यागोविंदाणे हे शल्य जातीयवादी प्रवृत्तीना टोचत आहे आणि म्हणून आज या दोन भावांडात दुफाळी निर्माण करण्याचं मोठं षडयंत्र प्रस्थापित मंडळी, राजकारणी, जातीयवादी प्रवृत्ती करत आहेत हे आज आम्ही ओळखून आमच्यात फूट न पडता एकत्र राहण्याचा प्रयत्न करणं आणि राहणं ही आजची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलगामी भूमिकेला कोणीच समजून घेतले नाही कारण जातीयता, अज्ञान आणि म्हणून त्यांना आपली प्रेरनाणाची आग मागे जाऊन ती फुल्यात आणि बुद्धात शोधावी लागली. अण्णाभाऊ मुंबईत पोट भरण्यासाठी आले होते ते साहित्यिक, लेखक होण्यासाठी आलेच नव्हते. ते आपलं पोट भरायला, जाळायला योगायोगाने गिरणीत कामाला लागले होते. मुंबईने त्यांना लेखक बनविले. तेथीलं परिस्थिती आणि गिरणीतील हवामान अर्थात कामगार जीवनाने त्यांना “लेखक हो, आमच्या वेदना जाणून त्या लेखणीतून मांड “असं आग्रहने सांगितल्यासारखे दिसून येते.
1956 नंतर अण्णाभाऊच्या पुनर्घटना होण्यास सुरुवात झाली. पार्टीच्या जातीविषयक धोरणाशी न पटणे, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर मनातून वाढणे, तो पार्टीच्या जातीयवादी सदस्यांना सहन न होणे.अण्णाभाऊंचे प्रखर व वास्तव बोलणे त्यातून हेवेदावे यामुळे अण्णाभाऊ दुःखी होत असत. येथील परंपराच्या समाजबांधणीच्या तत्वाच्या मुळाशी ते जाऊ लागले. जातीयवाद या अंगाने मानवतेला मानवतेला जगणं नाकारणारी भयंकर सामाजिक विषमता त्यांच्या ललित कृतीतून आणि अधिक प्रभाविपने भाषणे आणि बोलणे यातून प्रखर टीका आणि वास्तव दिसून येते. त्यांना 1956 नंतर बाबासाहेबांच्या व्यक्तीतत्वाशी त्यांना बांधून टाकले. मनाने बांधून टाकले. हा अण्णाभाऊच्या जीवनातील प्रचंड अंत :कळहाचा आणि संक्रमणाचा काळ होता.
*जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव *
हे त्यांचे गीत नोंद करण्यासारखें असून आम्ही आज त्यावर विचारमंथन आणि आत्मचिंतन करणे महत्वाचे आहे.
आखेर 18 जुलै 1969 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली, तुफानातील दिवा शरीररूपाने विझला गेला असला तरी त्यांचा साहित्यिक, वैचारिक ठेवा मात्र जिवंत असून तो आम्हाला आणि च्या पिढीला प्रेरणादायी, मार्गदर्शक, दिशादर्शक ठरेल आणि तो आम्ही सार्थ करू हिच अण्णाभाऊना आजच्या स्मृतिदिनांनिमित आदरांजली आणि विनम्र अभिवादन.
–
जानराव यु एफ
कुष्ठरोग तंत्रज्ञ
एम ए (पालि )
पालि साहित्य, बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञान अभ्यासक
रिपब्लिकन कार्यकर्ता.
जिव्हाळा निवास माढा जि सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत