धम्माविषयी सामान्य ज्ञान
अरविंद भंडारे
तथागतांच्या शरीरावरील ३२ लक्षणे
१. सुप्पतिठ्ठितपादो – पायाचे तळवे जमिनीवर समान पडतात.
२. पादतलचक्कलक्खणं – पायाच्या तळव्यावर चक्रवर्ती राजाचे चक्र.
३. आयतपण्हिं – आयताकृती लांबसडक विस्तृत टाच.
४. दिघड्गुलि – पायाची बोटे लांब सडक.
५. ब्रह्मुजुगत्तो – उभे राहण्याची ऐट ब्रम्हासारखी. वय वाढले तरीहि तरूणासम दिसतातट ( हा बौध्द वाड़मयात येणारा ब्रम्ह आहे).
६. सत्तुस्सदतालक्खणं – खांदे, मान, हात व पाय यामध्ये बहिर्गोलता व भरीव.
७. सिंहहनु – हनुवटी सिंहाप्रमाणे.
८. समदन्तो – सर्व दात समान.
९. सुसुक्कदाठो – सर्व दात सफेद.
१०. पहूतजिव्हो – जीभ लांब व पातळ.
११. ब्रम्हसरो – आवाज अत्यंत मधूर ( आवाज बौध्द वाड्मयात येणाऱ्या ब्रम्हासारखा )
१२. सुवण्णवण्णो – सुवर्णकांती.
१३. मुदुतलुनहत्थपादो – हाता पायाची त्वचा कोमल.
१४. उस्सड़खपादो – पायाच्या टाचा वर उचललेल्या.
१५. उध्दग्गलोमो – शरीरावरील सर्व केस उजवीकडे वळलेले.
१६. अभिनीलनेत्तो – डोळे निळे भोर.
१७. एकेकलोमो – शरीरावरील प्रत्येक केस छिद्रातून केवळ एकच केस.
१८. चत्तालिसदन्तो – चाळीस दात.दातांच्या मध्ये फटी नसतात.
१९. अविरळदन्तो – दातांना कोठेही छिद्र किंवा फट नाही.
२०. रसग्गसग्गी – जीभेचा अग्र अतिशय संवेदनशील.
२१. उण्हीससीसो – उंचवटा आलेले डोके. तो उंचवटा जटेसमान भासत असे.
२२. जालहत्थपादो – हाता पायाची बोटे जाळीयुक्त असलेले. एकमेकांना जोडलेली.
२३. कोसोहितवत्थगुय्हो – जननेंद्रीय पूर्ण झाकलेले.
२४. निग्रोध परिमण्डलो – शरीराची लांबी, रूंदी समान ( दोन्ही हात पसरून ).
२५. अनोनमन्तजाणुपरिमज्जनता – खाली न वाकता आपल्या गुडघ्यांना आपल्याच हाताने स्पर्श करू शकतात. त्यांचे परिमर्जन करू शकतात.
२६. सीहपुब्बध्दकायो – कंबर सिंहासारखी.
२७. समवट्टक्खन्धो- गोल आणि एकसमान वळलेले खांदे.
२८. चितन्तरसो – पाठीचे दोन भाग वेगळे न दिसता समान दिसतात. मणक्याची रेषा दिसत नाही.
२९. सुखुमच्छवि – कायेला कोणत्याही प्रकारची धूळ चिटकत नाही.
३०. एणिजड़घो – हरीणासारखे कमनीय टजांघे.
३१. गोपखुमो – पापणीचे केस वृषभासारखे.
३२. उण्णा लोमा भमुकन्तरे – कपाळाच्या मध्यभागी थोडे सफेद लोम.
अरविंद भंडारे
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
15 जुलै, 2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत