विजदर वाढीच्या विरोधात वंचित चे आंदोलन
नागपूर : विदर्भात मुबलक प्रमाणात वीज निर्मिती होते, परंतु विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वारंवार विज दर वाढीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसतो. महाराष्ट्र शासनाच्या महावितरण ने नुकताच पुन्हा दरवाढी चा निर्णय घेतला, त्याविरोधात आज वंचित बहुजन आघाडी तर्फे दक्षिण नागपूर चे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात तुकडोजी पुतळा चौक स्थित महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नागरिकांची वीजदर वाढीतून मोठ्या प्रमाणात शासन व्यवस्था आर्थिक लूट करत आहे. शासनाने प्रथमतः राज्यातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे, त्यानंतरच दरवाढीतून जनतेकडून पैसे वसूल करावे. अन्यथा वीजदर वाढ करण्याचा विचार शासनाने करू नये. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
वीजदर भरमसाठ वाढवून देखिल गावाखेड्यातील नागरिकांना दररोज लोड शेडींगचा सामना करावा लागतो. ग्रामिण भागात दिवसाने लोड शेडिंग केली जाते व रात्रीला तीन फेजचा वीजपुरवठा केल्या जाते. ज्यातून शेतकरी रात्रीला शेतावर जाऊन ओलिताचे काम करतात. हे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे काम आहे. परंतु बेजबाबदार शासन व्यवस्था नागरिकांचे दुःख जाणून घेत नाही. यावर संताप व्यक्त करण्यात आला.
आजचे युग इलेक्ट्रिकचे आहे. इलेक्ट्रिक शिवाय कोणतेही साधन चालत नाही. म्हणून नागरिकांना कमी किमतीमधे सोलर सिस्टम उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्राचे हुकुमशाही जोपासनारे शासन अशा उपाययोजना करेल की नाही याबाबत शंका आहे. प्रीपेड मीटर ला सुद्धा नागरिकांचां विरोध आहे. त्याचप्रमाणे सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकच्या योग्य वापराविषयी सरकारी नोकरदारांना शहाणे बनवावे, यासाठी शासन प्रथमतः शहाणे बनले पाहिजे. जर शासन व्यवस्था कमी दरात वीज उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशा शासन व्यवस्थेला नागरिकांनी शासन व्यवस्थेतून खाली खेचले पाहिजे, असे मत आंदोलकांनी मांडले.
जर वीज दरवाढ मागे घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दक्षिण विधानसभेच्या महासचिव कांचनताई कांबळे यांनी शासनाला दिला.
प्रसंगी सविता कांबळे, माया मोटघरे, माया पाटील, मंजुषा बागेश्वर, प्रमिता तेलंग, ममता ढोबळे, शत्रुघ्न धनविजय, भीमराव कांबळे, महानंदा मोडक, तारा सोमकुवर, प्रमिला गाडगे, सरिता थूल, आशा भगत व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत