महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड 11 जुलै 1997, शहीद भीमसैनिकांना 26 व्या स्मृतिदिनानिमित्त “दैनिक जागृत भारत” तर्फे विनम्र अभिवादन!!!

घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड 11 जुलै 1997 शहीद स्मृती अभिवादन 11 जुलै 1997 रोजी माता रमाबाई नगर घाटकोपर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना निषेधार्थ आंबेडकर समाजाच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद भीमसैनिकांना 26 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!!
त्यापेक्षा तत्कालीन शिवसेना भाजपच्या सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी बारा भीमसैनिकांच्या हत्या घडून आणल्या .सत्तेचा माज जडलेल्या सरकारने व मनुस्मृति मानणाऱ्या प्रशासक वर्गाने हे हत्याकांड घडून आणले ,सत्तेच्या जीवावर हे हत्याकांड करण्यात शासक वर्ग यशस्वी झाला .परंतु ज्यांची हत्या केली त्या वर्गामध्ये आजही सत्ता मिळवण्या बद्दल उदासीनता आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं की “”जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची शासन करतील जमात बनायचे आहे “”मात्र आम्ही कुठल्याही पद्धतीने राज्यकर्ती जमात बनण्याचे प्रयत्न यशस्वी करू शकलो नाही .फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून ,मी त्यांचे वारस आहोत ,हातोरा मिरवत राहिलो .म्हणूनच आमच्यावर अशा वेळ येतात .1956 ते 2024 एवढ्या प्रदीर्घ काळात आम्हाला राजकीय पक्षाची प्रादेशिक मान्यता सुद्धा मिळवलीता आलेली नाही .ही खेदाची गोष्ट आहे .

हे ओळखूनच आम्हाला हिनपणाची वागणूक देऊन आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न शासक वर्ग करत आला आहे आणि करील ही म्हणून आम्ही या देशाची शासनकर्ती जमात होणे गरजेचे आहे .या शहिदांना अभिवादन करण्याबरोबरच शासनकर्ती जमात होऊया हा निश्चय मनात बाळगून येणाऱ्या काळामध्ये आगे कूच करावी ही अपेक्षा .घाटकोपर रमाबाई आंबेडकर हत्याकांड 11 जुलै 1997 शहीद भीम सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!