बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी मागण्यासाठी दिनांक ८ जुलै २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आवारात आमरण उपोषण
आमरण उपोषण 3 रा दिवस
बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांचे अमरण उपोषण.
सांगली दि. १०
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्कप्रमुख ‘संजय भूपाल कांबळे’ व त्यांचे सहकारी यांनी बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी मागण्यासाठी दिनांक ८ जुलै २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आवारात आमरण उपोषण करीत आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस.
१) बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास निष्कर्ष ठरत असल्याने त्यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम ब कल्याणकारी मंडळ, मुंबई अध्यक्ष पदावरून तात्काळ हकालपट्टी करा.
२) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई कार्यकारिणीने अतिरिक्त केलेल्या खर्चाची व त्यांच्या वाढ झालेल्या संपत्तीची इडी मार्फत चौकशी करा.
३) बांधकाम कामगार मंडळात कामगार पुरवणारी खाजगी कामगार पुरवणारी कंपनी S2 यांची मुदत संपली असल्याने बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला कायम किंवा मानधन तत्वावर नोकरीला घ्या.
४) कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केलेल्या रागिनी अशोक खिलारे यांना तात्काळ बांधकाम कामगार मंडळावर नोकरीस घ्या.
५) निवृत्त गट अ वर्ग अधिकारी यांची नियुक्ती करून, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वेगळे स्वतंत्र कार्यालय सुरू करा.
६) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या नातलगांची बोगस नोंदणी तात्काळ रद्द करा.
७) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बोगस नोंदणी कृत श्रीमंत बागायतदार धन दांडगे नोकरदार यांची बोगस नोंदणी ची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.
८) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सन 2022 – 23 तसेच 2023 – 24 या वर्षातील आर्थिक उलाढाल बाबत विशेष कमिटी स्थापन करून ऑडिट करा.
९) बांधकाम कामगारांच्या मुलांना फार्मसी तसेच नर्सिंग शैक्षणिक लाभाच्या रकमेत वाढ करा.
१०) बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य संघ पुरविणारा ठेकेदार मफतलाल या कंपनीने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वितरणाचे करत असल्याने मफतलाल इंडस्ट्री ज लिमिटेड, मुंबई कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करा.
वरील प्रमाणे या सोबतच इतर ३१ आमच्या मागण्या मान्य करून खऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत. तसेच सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा वापर बंद करावा राजकीय हस्तक्षेप थांबवा. या साठी मी पालकमंत्री तथा कामगार मंत्री, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,सांगली जिल्हा यांच्या दालना समोर आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन घ्या मार्फत लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करीत आहे. तरी आमच्या मागण्या ताबडतोब माण्य करा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई, तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असाल यांची नोंद घ्यावी ,असा इशारा, उपोषण करते संजय भूपाल कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव प्रशांत वाघमारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा संघटक नितीन सोनवणे, उमरफारूख ककमरी, हिरामण भगत, युवराज कांबळे, रतन तोडकर, लहरीदास कांबळे, रविंद्र ढाले सर, उमेश लाडगे, समीर वाडकर बंदेनवाज राजरतन, संदिप कांबळे, नितीन बळखंडे,विजय आवटे, चंद्रकांत खरात, सतिश शिकलगार, आनंदसागर पुजारी, उत्तर काटे, विनायक हेडगे, नितीन माने,राजु कांबळे, प्रकाश कांबळे, अमित चव्हाण,दादासो सदाकळे, राहुल हिरोडगी, विनोद वाघमारे यांच्या सहित बांधकाम कामगारांचा आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व बहुजन बांधवांचा पाठिंबा मिळत आहे.
कळावे
या व इतर विविध मागणीसाठी आमरण उपोषणासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे हे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपोषणासाठी बसले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत