महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

पेराल तेच उगवेल

वसंत कासारे.
होय, पेराल तेच उगवत. परंतु असही होत, की कधी कधी पेरलेल उगवतच नाही. सेम तसच चांगल्या कर्माच फळ चांगलच मिळत. परंतु कधी कधी चांगल्या कर्माच फळ वाईटही मिळत. हे का होत ? तथागत म्हणतात या सृष्टीत कारणाशिवाय झाडाच पानही गळत नाही. याचाच अर्थ चांगल्या कर्माच फळ वाईट मिळण्यासाठीही कारण असत. पेरलेल का उगवत नाही ? कारण ते आपण योग्य ठिकाणी पेरल नाही, पेरल पण पाऊसच पडला नाही, पाऊस पडला पण इतका की पेरलेल कुजून गेल, अशी अनेक कारण असतात पेरलेल न उगवण्या साठी. तसेच सेम होत चांगल्या कर्माच्या बाबतीत. उदा. सापाला भक्तीभावान दूध पाजल पण पाजताना सापान दंश केला. एखाद्यावर विश्वास ठेवला पण त्यान विश्वासघात केला. हे अस का होत ? कारण आपल्याला त्याच ज्ञान नसत. याच उत्तम ज्ञान तथागत बुध्दांच्या धम्मातच मिळू शकत. कुशल कर्म आणि अकुशल कर्माच ज्ञान सुध्दा धम्मातूनच मिळू शकत. तथागत बुध्दांचा धम्म तेच शिकवतो. महा मानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा घेताना भिक्खूसंघाला वंदन करायला नकार दिला. तसेच ते म्हणत भीका-याला भीक देण म्हणजे अकुशल कर्म (पाप ) आहे. ते सागत की माणसावर भीक मागायची वेळच येऊनये अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्या साठीच घेईल त्याला घेईल तितक मोफत शिक्षण हे त्यांच ध्येय्य होत. हे प्रगल्भ विचार म्हणजेच धम्म. याच साठी धम्म आहे. परंतु आम्ही धम्म समजून घ्यायलाच तयार नाही. ही फार मोठी शोकांतीका आहे. आम्ही कर्म करतोय पण त्या कर्माची फळ मात्र वाईट मिळत आहेत. तसेच कुशल कर्म कोणते आणि अकुशल कोणते हे सुध्दा आम्हाला अजून कळलेल नाही. दारात चार चाकी गाडी आली. पण चालवण्याच कौशल्य आम्ही शिकलोच नाही तर ती गाडी कोण चालवील ? दुसराच ना ? तेच होतय बौध्द समाजाच. आम्हाला कोणीही चालवतय. आम्ही कुशल कर्म समजून अकुशल कर्म करतोय. आमची अवस्था मुकी सारखी झालेली आहे. मुकी बिचारी, कुणीही हाका. कुणीही घ्या मुका. बिचारी बोंबलूच शकत नाही. तसच झालय आमच, कारण आम्हाला कुशल कर्म कोणते आणि अकुशल कर्म कोणते हेच माहित नाही. कारण आम्हाला धम्मच माहित नाही. पुस्तकात न बघता गाथा बोलता आल्या म्हणजे तो लय मोठा धम्म ज्ञानी असाच समज आहे आमच्या लोकांचा. पुजापाठाच्या गाथांच्या पुढ जीवन जगण्याची कथाच आम्हाला माहित नाही. आमच्यातला बौध्दाचार्य, श्रामणेर गाथा बोलतो, पूजा विधी करतो , तो म्हणजे आमच्यातला सर्वज्ञानी, गुरू ठरतो. त्यामुळ त्या पलिकडे काही धम्म आहे याचा विचारच केला नाही. मुळात धम्म ही एक दिवस, तास दोन तास ऐकण्याची गोष्ट नाही तर धम्म ही प्रशिक्षणाची गोष्ट आहे. योग्य पध्दतीन प्रशिक्षण राबवल गेल पाहिजे. ही सातत्याची प्रक्रीया आहे. तात्पूर्ती क्रिया नाही. लोणच मुरवल्यावरच खायला मजा येते. तसच धम्म आमच्या रक्तात मुरला पाहिजे. हे मुरण एक दिवसात होत नाही. अनेक दिवसांची प्रक्रिया गरजेची आहे. ही गोष्टच आम्ही मान्य करीत नाही. म्हणून चांगल्या कर्माची फळही आम्हाला वाईट मिळत आहेत . जस पेरण्या पूर्वी आपण शेतात काम करतो. तीच काम आपल्या मनासाठी करण गरजेच आहे. तथागतांनी मनाला शेताची उपमा दिलेली आहे.
शेतात करतात ती काम मनात कशी करायची याचा विचार व्हायला हवा. अन्यथा पेरलेल उगवणारच नाही.????
वसंत कासारे.
(8087480221).

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!