दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आंबेडकर निष्ठ संघर्ष शील नेतृत्व कर्मवीर धम्म रक्षक अँड हरिदास आवळेबाबू-विनायकराव जामगडे


परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी येथील जातीयवादी धर्मवादी भांडवलशाही जमीनदारा. विरूद्ध जन आंदोलन उभे केले. त्याला जनमानसात रूजविणयाचे कार्य कर्मवीर धम्म रक्षक अँड हरिदास आवळे बाबूजींनी केले.समता सैनिक दलाला कार्यरत करण्यासाठी तरूणांना प्रवृत्त केले.जनजागृतीची मशाल पेटवून येथील व्यवस्थेच्या उरावर संघटनेच्या माध्यमातून दबाव निर्माण केला. प्रत्येक माणूस स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांना हिम्मत देण्याचे कार्य हरिदास आवळे बाबूजींनी केले.
आंबेडकर यांच्या आदेशाचे पालन
समाज हिताच्या दृष्टीने संघटनेच्या माध्यमातून काही आंदोलनात्मक चळवळ उभी करण्याच्या दृष्टिने डॉ बाबासाहेब आंबेडकर सूचना करीत असत त्यांचे पालन करून जन आंदोलन करीत असत.
सतनामी समाजाला आंबेडकरी चळवळीचा भाग केला.
छतिसगड या भागात सतनामी समाजाचा मोठ्या प्रमाणात समुह राहत होता. त्यांना संघटित करून आंबेडकरी चळवळीत सक्रीय करून चळवळीत उतरविला त्यामुळे सतनामी समाज व्यवस्थे विरूद्ध संघर्ष करण्यास तयार झाले.जातीवादाचे जू फेकून देऊन मानवतेने प्रेरीत होऊन समतावादी शोषणरहित समाजव्यवस्था आणण्यासाठी संघटना द्वारे चळवळ केली.याला कर्मवीर हरिदास आवळेबाबू यांचे मार्गदर्शन व कणखर नेतृत्व कारणीभूत होते.
समता सैनिक दलाचे अध्यक्ष
1957ला अखिल भारतीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष निर्वाचित झाले. संपूर्ण देशात समता सैनिक दलाच्या शाखा तयार केल्या.कोणावर अन्याय करायचा नाही व अन्याही सहन करायचा नाही हे ब्रिद समता सैनिक दलाचे होते.
राजकिय कार्य
स्वतंत्र्य मजूर पक्ष शेडयूल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्षाचे कर्मठ नेते म्हणून ते परिचित होते. त्यांनी पक्षबांधणी करिता अतोनात परिश्रम घेतले.पक्ष मजबूत केला.
लोकशाही व आंबेडकरी तत्व निष्ठा
बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही पद्धतीने पक्ष चालवावा असे संकेत दिले होते. त्यांचे पालन व्हावे यासाठी प्रयत्नशील राहून पक्षावर दबाव निर्माण केला.व लोकशाहीचा अवलंब करावा ह्यासाठी समाज बहिष्काराला समोर गेले.ते आंबेडकर तत्वाचे पक्के होते.
विदर्भ वादी नेते
बाबासाहेब आंबेडकरांनी लहान राज्याची शिफारस केली होती. म्हणून वेगळा विदर्भ राज्य व्हावे यासाठी वेगळे विदर्भ राज्य आंदोलन चालवून नेतृत्व केले. विदर्भवादी लोकांचीही एकजूट करून
विदर्भाचा आवाज बुलंद केला. यासाठी तुरूंगवास सुद्धा भोगला.ते जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत विदर्भवादी नेते होते.
धम्म रक्षक
1964च्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 14/10/1956ला परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेली धम्म दीक्षा नसून ती राजकिय सभा होती असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला त्यामुळे धममदीक्षाच धोक्यात आली .हे बुद्ध धम्मावर संकट आले. त्यांच्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करून 14/10/1956चा धम्म दीक्षा समारंभ होता राजकिय सभा नव्हती असा महत्वपूर्ण निर्णय दिला व बौद्ध धम्मावर आलेले संकट टळले. म्हणून जनतेने त्यांना धम्म रक्षक ही पदवी बहाल केली.
मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटनेला बेईमान होणार नाही
1971ला लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असताना जाहिर सभेत बोलताना म्हणाले की लोक मला विचारतात की लोकसभेत निवडून जाऊन काय करणार मी काय करणार नाही हे प्रथम सांगतो मी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाला व पक्षाला बेईमान

होणार नाही . हे वाक्य पूर्ण करताच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला व ते सभेतच शहीद झाले तो दिन2/3/1971हा होता.
त्त्यांचा जन्म 1/7/1916ला कामठी जवळील छावनी येथे झाला. त्यांच्या जन्माला 108 वर्षे पूर्ण होऊन 109 वर्ष सुरू झाले त्यांना विनम्र अभिवादन
विनायकराव जामगडे
अध्यक्ष
कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठान
9372456389
7823093556

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!