विज्ञान शाखेत नर्सिंगचे विद्यार्थी “विज्ञान” शिकतात की “अज्ञान” हेच कळत नाही !

विजय अशोक बनसोडे
विज्ञानात कर्मकांड कसे ? कर्मकांड व अंधश्रद्धा हे तर अज्ञानाचे लक्षण होय!
भारताच्या ऐकून प्राचीन इतिहासातील नागवंशीय आचार विचार पद्धतीचा,मातृसत्ताक पद्धतीचा इतिहासा बरोबरच आणि बौद्ध धर्माचा जवळपास 900/1000 वर्षाचा स्त्री/पुरुष समतेचा काळ वगळता भारता मध्ये हजारो वर्ष सर्वच वर्णातील आणि जातीतील स्त्रिया मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या गुलामच होत्या. खरं तर आजच्या महिलांनी आणि मुलींनी माहिलांच्या गुलामीचा इतिहास वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कारणं त्या शिवाय महिला आणि मुलींना कळणार नाही की,आपलं उद्धार कोणी केला.आज ही उस्मानाबाद सारख्या मागास जिल्ह्याच्या ठिकाणी उस्मानाबाद शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नर्सिंगची (GNM, ANM) अभ्यासक्रमाची विज्ञान विभागाची एक शाखा असून यावर मेडिकल कॉलेजच्या डिन डोमकुंडवार मॅडम यांची देखरेख आहे.ज्या स्वतःहा उच्चशिक्षित आहेत.
खरं तर कर्मकांड आणि अंधश्रद्धा ह्या बाबी आज्ञानाचे लक्षण असून बऱ्याच भारतीय आणि आभारतीय विचारवंतानी सिद्ध केले आहे की,कर्मकांड आणि अंधश्रद्धा जोपासणे म्हणजे मानसिक आजाराचे प्रतिक आहे.त्यामुळं संबंध भारतातील महिला/मुलींनी आपल्या अधोगतीच्या कारणांची कारणमिमांसा केलेली गरजेची वाटते.तरच आपल्या लक्ष्यात येईल की, महाराष्ट्रात ज्योतिबा फुले,सावित्रीमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्त्री उद्धारात किती अनमोल योगदान आहे.
वास्तविक पाहता अशा विषयावर लिखाण करावे की नाही हा संभ्रम सुद्धा आहे.कारण भारताचं संविधान हे भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती आणि कोणताही धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा,अनुसरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला बहाल करते.त्याच बरोबर धर्म आचरणासंबंधी स्वातंत्र्य सुद्धा देते.परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मूलभूत अधिकार देत असताना भारतीय संविधान “धर्मनिरपेक्षता” हे तत्व सुद्धा अनुसरते आणि भारतीय नागरिकांना अनुसरण्यास सांगते.
परंतु आपण पाहत असतो की, सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या विविध प्रकाराच्या कार्यालयामध्ये आणि सरकारच्या देणगीवर अर्थात निधीवर चालणाऱ्या विविध शाळा,संस्था आणि महाविद्यालयांमध्ये “धर्मनिरपेक्षता” तत्त्व अनुसरणे अत्यंत गरजेचे असताना सुद्धा “धर्मनिरपेक्षतेला” पायदळी तुडवण्याचेच काम या शाळा,कॉलेज आणि शासकीय कार्यालयामध्ये होताना दिसत असते.म्हणजे एकूणच भारतीयांच्या कर रुपी पैश्यांवर चालविण्यात येणाऱ्या सरकारी कार्यालये आणि विविध प्रकारच्या शाळा,महाविद्यालयात एखाद्या विशिष्ठ धर्माच्या देवी देवतांचे पूजा पाठ करण्यात येते.
शासकीय कार्यालयामध्ये शाळा, संस्थांमध्ये “धर्मनिरपेक्षता” अनुसरावी हे जरी भारतीय संविधान सांगत असले,तरी सुद्धा आपण पाहतो की,ज्या विचारसरणीचे सरकार देशात आणि राज्यात असते त्याच (सत्ताधारी लोकांच्या) विचारसरणीला अनुसरण्याचं काम सुद्धा विविध शासकीय कार्यालय शाळा,संस्थांमध्ये होत असते.याचा अर्थ असा होतो की,ज्या धार्मिक विचाराचे सरकार असते.त्यामुळं त्याच धार्मिक विचारला शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा अनुसरण्यात येते.अशा वेळी मात्र इतर धर्मिय लोकांच्या भावना दुखावतील याचा कोणी ही विचार करत नाही.या अनुषंगाने कांशीरामजी नेहमी सांगत असत की,जिनका शासन होता है, उसी का धर्म फलता और फुलता है !
परंतु या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की,उस्मानाबाद शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या नर्सिंग शाखेमध्ये मोठ्या भक्ती भावनेने गणपतीची पूजा अर्चा करण्यात येते.खरं तर कोणी कोणत्या धर्माचं आणि देवी-देवतेचे पूजन करावे.हे ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे.परंतु एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये,एखाद्या कार्यालयामध्ये विशिष्ट एका धर्माच्या देवतेचा पूजा पाठ करणे कितपत योग्य आहे ? याकडे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने गांभीर्याने पाहावे.कारण शासन परिपत्रक दि 07 जून 2002 च्या सरकारी परिपत्रकाप्रमाणे सरकारी आणि सरकारी अनुदानवर चालनाऱ्या विविध संस्था,शाळा,महाविद्यालय आणि आर्टस्,कॉमर्स आणि सायन्स (विज्ञान) शाखेत विशिष्ट एका धर्माच्या देवतेची पूजा पाठ करणे चुकीचे आहे.
बर त्याही पेक्षा महत्त्वाची बाब अशी आहे की,मेडिकल कॉलेज हे सायन्सला (विज्ञानाला) मानते.अर्थात विज्ञानाला धरून चालते. म्हणजेच जिथे विज्ञानाचे धडे गिरवायचे आहेत तिथे धार्मिक अज्ञानाचे धडे गिरवणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी नव्हे काय ? असाही प्रश्न निर्माण होतो.या नर्सिंग कॉलेजमध्ये म्हणजे सरकारी आवारातच बर का… सार्वजनिक बांधकाम विभागाने एक छोठासा मस्त असा गणपती बसविण्यासाठी कट्टा सुद्धा बांधून दिला आहे.आणि या गणपतीची रोज विधिवत पुजा आर्च्या नर्सिंग (GNM/ANM) विज्ञान शिकणाऱ्या भगिनी करत असतात.आता या प्रवृत्तीला नेमकं काय म्हणावं हेच समजत नाही.
भारतीय संविधानाने कलम 19 प्रमाणे भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती आणि कलम 25 प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य दिले असले तरी ही भारतीय संविधानाच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात कलम 51(क) मध्ये पोट कलम “ज” मध्ये असे सांगण्यात आले आहे की,भारतीय नागरिकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व प्र सुधारणावाद यांचा विकास करणे. आता आपण भारतीय संविधानाच्या या शिकवणुकीचा जर विचार केला तर आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येते की,आपण जे वर्तन शासकीय आवारात करत असतो.ते किती चुकीचे आणि घटनाबाह्य आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना येते.इतकेच नव्हे तर आपले अर्थात विद्यार्थ्यांचे वर्तन आणि जीवन हे मानसिक व बौद्धिक गुलामीच्या दिशेने जाणारे आहे. याची आपणास जाणीव होते.तर आपण आपले मूलभूत कर्तव्य ही धर्मांध होऊन विसरून जात आहोत ना….
तर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की,भारतीय संविधानातील “धर्मनिरपेक्षता” या तत्त्वाच तंतोतंत पालन व्हावं यासाठी शासकीय सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विविध शाळा, महाविद्यालय आणि संस्था यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट एका धार्मिकतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवी-देवतांची पूजा अर्चना शासकीय आवारात करायची नाही. आणि सरकारी कार्यालयामध्ये त्यांचे फोटो ही लावायचे नाहीत,असा सरकारी अध्यादेश असताना सुद्धा मेडिकल उस्मानाबाद मेडिकल कॉलेजच्या नर्सिंग विभागात कोणत्या कायद्याच्या आधारे एका विशिष्ट धर्माच्या देवतेचा पूजा पाठ करण्यात येतो.याचे उत्तर मेडिकल कॉलेजच्या डीन श्री.डोमकुंडवार मॅडम यांनी द्यायला पाहिजे.किंवा आपण जी कृती या शासकीय आवारात करत आहात ते वर्तन चुकीचे आहे. असंविधानिक आहे.हे समजून घेऊन ते तुरंत बंद केले पाहिजेत.
विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत