मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील यूनिटी मल्टीकॉन कंपनीने केलेली कामे पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी :- शहबाज काझी

नळदुर्ग येथे यूनिटी मल्टीकॉन कंपनीचा दशकपुर्ती सोहळा संपन्न

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नुकसानाची पर्वा न करता कोट्यावधी रुपये खर्चुन नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभिकरण करुन कायापालट केले. इतिहास प्रेमी नागरिक व येणा-या पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुची माहिती व्हावी या हेतुनी अवाढव्य किल्ल्यात सुशोभिकरण व सोयी सुविधा निर्माण करण्यात प्रारंभीचे चार वर्ष गेले. त्यानंतर कोरोनात दोन वर्ष गेले. तर अतीवृष्टीत किल्ल्यात खुप मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर नाम माञ उत्पन्न मिळाले तर खर्च आधिक झाले. सर्वाच्या सहकार्यामुळेच किल्ल्याचे पर्यटन क्षेत्रात नावलौकिक झाल्याचे मत युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यानी स्नेह मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
सन १९१४ रोजी करारान्वये महाराष्ट्र सरकार व राज्य पुरातत्व विभाग यांनी नळदुर्गचा किल्ला दहा वर्षासाठी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीला दत्तक म्हणून संवर्धन व संगोपनासाठी दिला. हा दहा वर्षाचा कालावधी संपत आल्याने नळदुर्ग येथिल युनिवंडर्स रिसाॕर्ट याठिकाणी सोमवारी युनिटी कंंपनीच्या वतीने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी युनिटी मल्टीकॉनचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी , संचालक जयधवल करकमकर यांनी उपस्थित मान्यवारांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.
नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील झालेली विकासाची कामे किंवा वृक्ष लागवड व पिण्याच्या पाण्याची सोय हे भविष्यात पर्यटकांसाठी टिकून राहावे यासाठी आणखी दहा वर्षे हा किल्ला महाराष्ट्र राज्य संरक्षित स्मारक संवर्धन योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार व पुरातत्व विभागाने सध्या या किल्ल्याची संगोपन करण्याची जबाबदारी ज्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडे आहे. त्याच कंपनीकडे दत्तक देण्याची मागणी अनेक मान्यवरानी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.
युनिटीने किल्ला संगोपनासाठी घेतल्यानंतर गेल्या दहा वर्षात किल्ल्याचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व पर्यटक वाढीसाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले आहेत. दहा वर्षापूर्वीचा किल्ला आणि आजचा किल्ला यामध्ये खुपच बदल झालेला आहे. पूर्वी किल्ल्यात भग्नावस्था होऊन आखेरची घटका मोजत होता. मात्र आज त्याचे रूपडे पालटुन निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. किल्ल्यात केलेल्या विकास कामामुळे युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने किल्ल्यात हजारो वृक्ष लावून त्याची जोपासना केली आहे. त्यामुळे आज किल्ल्यात सर्वत्र हिरवी, वनराई दिसत आहे.
वृक्ष लागवडी बरोबरच विविध जातीचे फुलझाडेही सर्वत्र लावण्यात आली आहेत. जागोजागी पर्यटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहांची सोय आहे
युनिटीने किल्ल्यात केलेल्या कामामुळे आज नळदुर्गचा ऐतिहासिक व प्राचीन किल्ला पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर आला असुन एक रोल माॕडल ठरला आहे. किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. हे सर्व टिकून राहण्यासाठी पुन्हा एकदा पुढील दहा वर्षासाठी हा किल्ला महाराष्ट्र सरकार व पुरातत्त्व विभागाने युनिटी कंपनीला संगोपनासाठी दत्तक देणे गरजेचे आहे या किल्ल्यातील नयनरम्य दृश्य पर्यटकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा असून पर्यटक या दृश्या बघुन समाधान व्यक्त करतात
या कार्यक्रमास शहबाज काझी, कमलाकर चव्हाण, सुनिल बनसोडे , रघुनाथ नागणे, ज्योतीबा येडगे, प्रमोद कुलकर्णी , सुभद्राताई मुळे, कल्पनाताई गायकवाड , सुधीर हजारे, आविनाश नरवडे, शिवाजी गायकवाड , नितीन कासार , महालिंग स्वामी, संतोष पुदाले, धिमाजी घुगे, रमेश जाधव, वैजिनाथ कोरे, अमर भाळे, संजय जाधव, गोपाळ देशपांडे, मुश्ताक कुरेशी, शाम कनकधर , श्रमिक पोतदार, बसवराज धरणे, सरदारसिंग ठाकूर, शफी शेख , शरीफ शेख, आर पी आयचे बाबासाहेब बनसोडे, प्रा. डाँ. पाडूरंग पोळे, नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख , लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, शिवाजी नाईक आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विनायक अंहकारी यानी तर आभार युनिटी मल्टीकॉन्स संचालक जयधवल करकमकर यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटीचे जुबेर काझी , रईस जाहागिरदार नितीन पवार निखिल येडगे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!