प्रशीक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था मार्फत शैक्षणिक आर्थिक मदत अर्थसहाय्य

प्रशीक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था महाराष्ट्र (रजि) यांच्या मार्फत गेल्या वर्षी पासून बीपीएल/आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ८०टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थे मार्फत ₹ १००००/- दहा हजार व ट्रॉफी प्रदान करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम नुकताच खोपोलीतील यशवंत गायकवाड सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त माउंटन व्ह्यू रेसिडंसी मध्ये पार पडला

खोपोली मोहनवाडी येथील सांची भरत ससाणे हिला ८७.३० टक्के व आदित्य गणेश शिर्के रा वणी ता. खालापूर याला ९०.२० टक्के मार्क्स मिळाले या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत ₹ १००००/- दहा हजार आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा संस्थेचे अध्यक्ष, यशवंत गायकवाड, कोषाध्यक्ष एसबी गायकवाड, खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते कैलासजी गायकवाड, रविंद्र रोकडे यांच्या हस्ते या दोन्ही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आला.
गतवर्षी पासून प्रशीक संस्थेच्या माध्यमातून अशा होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत अर्थसहाय्य देण्यात येते गतवर्षी महाराष्ट्रातील १६ विद्यार्थ्यांना अशी मदत दिली होती. यावर्षी २०२४ मध्ये २०विद्यांर्थ्यांना मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील दोन खालापूर तालुक्यातील आहेत
या मंगल समयी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोसायटीच्या आवारात व बाहेर वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सोसायटीतील मान्यवर बी आर नारायणकर, शिवाजी पाटील, दौलत घुले, लक्ष्मण पाटील, भगवान दिसले बुवा, राजेंद्र सावंत, राजेंद्र म्हात्रे, राजू खांडेकर, गजानन जाधव, जागृती जाधव, स्वप्निला आंबेकर, नीतीन चिमणकर,हर्षला, श्रुती आंबेकर आणि सोसायटीचे मेंबर्स उपस्थित होते.
गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंनिस खोपोलीचे अध्यक्ष डॉ सुभाष कटकदौंड, संदीप गायकवाड, दयानंद पोळ, महेंद्र ओव्हाळ, ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वर्षाताई मोरे, ज्योती भुजबळ डायमंड गृप चे सदस्य भोसले सर, काशिनाथ गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत