आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

जागतिक योग दिवस

@ २१ जून @

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

‘जागतिक योग दिवस’ हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासद द्वारे २१ जूनला योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. २१ जून २०१५ साली पहिल्यांदा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवा मधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारावर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. अलीकडेच सामान्या मध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैली मध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर नि मन हे शरीराचे मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसना मधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योग दिवस साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की, सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते, हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो. याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा योग दिवस म्हणून निवडण्यात आला. तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

योग दिवसाची उद्दिष्टे

योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.

योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.

योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.

संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.

लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.

योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.

लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.

मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.

योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे. म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!