महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिकसामान्य ज्ञान

किती जुने आहे नालंदा?

जेंव्हा जगातील टॉपच्या विद्यापीठांबद्दल बोलले जाते तेंव्हा डोक्‍यात ऑक्‍सफर्ड आणि केंब्रिजचे नाव येते. मात्र नालंदा विद्यापीठ त्‍याहीपेक्षा जुने आहे. नालंदा तीन शब्‍दांनी मिळून बनले आहे. ना, आलम आणि दा. याचा अर्थ असा की, अशी भेटवस्तू ज्याला मर्यादा नाही. हे 5 व्या शतकात गुप्त काळात बांधले गेले आणि 7 व्या शतकात ते एक महान विद्यापीठ बनले.

नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये  भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनने शंभर खेडी विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत.

विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतिगृह, ऐंशी सभागृहे, शंभर अध्यापन कक्ष आणि अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने,  रस्ते होते.

हा एक मोठ्या बौद्ध मठाचा भाग होता. असे म्‍हटले जाते की याची सीमा जवळपास ५७ एकरमध्ये पसरली होती. यासोबतच अनेक अहवालांमध्ये हे विद्यालय आणखीन मोठे असल्‍याचा दावा केला जातो. काही नोंदीनुसार, ते एका आंब्याच्या बागेवर बांधले गेले होते, जे काही व्यापाऱ्यांनी गौतम बुद्धांना दिले होते.

१९ व्या शतकात सापडले

आधुनिक जगाला या विद्यापीठाबाबत १९ व्या शतकाच्या दरम्‍यान माहिती झाली. हे विद्यापीठ अनेक शतके जमीनीत गाडले गेले होते. 1812 मध्ये बिहारमध्ये स्थानिक लोकांना बुद्धांचे पुतळे सापडले, त्यानंतर अनेक परदेशी इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला. त्यानंतर याबाबत माहिती मिळाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!