ज्योतिबा समाजसुधारक नव्हते ,तर समाज क्रांतीचे युगप्रवर्तक पितामह आहे….

ज्योतिबांच्या सत्यशोधक धर्माची तुलना प्रार्थना समाज ब्राह्मो समाज यांच्यासोबत कदापि होऊ शकत नाही, ज्योतिबा असताना बौद्ध धम्म हा संशोधकाद्वारे पब्लिक डोमेन मध्ये आलेला नव्हता जर बौद्ध धम्माचे स्वरूप ज्योतीबा असतानाच सार्वजनिक पटलावर आले असते तर जोतिबांनी देखिल बौद्ध धम्म स्वीकारला असता….स्वतः ज्योतिबाची तुलना राजाराम मोहनराय ,आगरकर ,रानडे यांच्यासोबत देखील होऊ शकत नाही… तर बुद्ध- कबीर -ज्योतिबा- बाबासाहेब ही अशी युगपटलावरील एकमेव रचना आहे…. ज्योतिबा आणि बाबासाहेबांचा संघर्ष हा वर्णश्रम व्यवस्थेच्या अंतर्गत नाही तर तिचा विरुद्ध आहे.त्यामुळे ज्योतिबा समाजसुधारक नाही तर युगप्रवर्तक आहे. तर समाज सुधारक आणि पुरोगामी म्हणजे भक्ती संप्रदायासारखे विषमतेमध्ये बंधुभाव जातियतेमध्ये बंधुभाव , आर्थिक राजकीय व इतर सर्व सत्ता आम्ही उपभोगनार तुम्ही मात्र आमची सेवा निष्काम कर्मयोग सारखी सेवा करत आयुष्यभर दारिद्र्यात खितपत रहाणे…. जोतिबांचा सार्वजनिक सत्यधर्म हा समाज क्रांतीचा एक टप्पा आहे फाउंडेशन आहे तर बाबासाहेब कृत धम्मक्रांती हा अंतिम थांबा आहे…
युग प्रवर्तक समाज क्रांतीचे पितामह जोतिबांना जन्मदिनी विनम्र अभिवादन…
Prakash Tupe
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत