राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब स्मृतिदिन अभिवादन सभा संपन्न.
दिनांक १७जून ( वाघोली)पुणे.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटॉन, गाथा परिवार तुळापूर, राष्ट्रीय किसान मोर्चा पुणे यांच्या संयुक्तं विद्यमाने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा ३५० वा स्मृति दिवस अभिवादन करून साजरा करण्यात आला.
गाथा परिवार लोणीकंदचे सूर्यकांत शिवले, राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाजारे काका, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ( प्रोटॉन) चे प्रा.डी.बी. धावारे यांच्या यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी श्रीमंत तात्या कंद यांनी अभिवादन सभेचे अध्यक्षपद भूषविले. रवींद्र कंद यांनी प्रास्तविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून टुलेअण्णा ( माजी सरपंच) पेरणे हे उपस्थितीत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुरोगामी विचारवंत प्रा. संदीप लोखंडे यांनी जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
या वेळीं बोलताना सुर्यकांत शिवले यांनी जिजाऊ माँ साहेब यांनी बाल शिवाबावर संत तुकाराम महाराज यांच्या विज्ञान वादी विचाराचे संस्कार राजांना घडवू शकले असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटॉनचे प्रा.डी.बी. धावारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण मनुस्मृतीवर आधारलेले असून या देशाच्या मूलनिवासी बहुजन समाजाच्या पिढ्यांना गुलाम बनविण्याचे कटकारस्थान नागपूरच्या रेशीम बागेत तयार केले आहे. त्याचा विरोध करण्यासाठी शिवरायांच्या वारसदारांनी जनआंदोलन उभे केले पाहिजे हीच खरी जिजाऊ माँ साहेब यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे आवाहन केले.
श्रीमंत तात्या कंद यांनी विद्यमान केंद्रीय सरकारच्या बहुजन विरोधी,लोकशाही विरोधी, संविधान विरोधी धोरणाचा भावी पिढ्यांवर दूरगामी परिणाम होऊन लोकशाही संपून पेशवाईची गुलामगिरी लादली जात आहे. भारत देश संपून जाईल अशी भिती व्यक्त केली.
राष्ट्रीय किसान मोर्चा चे बाजारे काका यांनी बावीस जून रोजी पुण्यात शिक्षण परिसंवादात सहभागी होण्याचे आवाहन करून अभिवादन सभेचे आभार प्रदर्शन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत