आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण ; सेन्सेक्स 140 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

BSE सेन्सेक्स 140 अंकांनी घसरून 65,655 वर आला असून आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले.. निफ्टीही 37 अंकांनी घसरून 19,694 वर आला. ऑटो आणि मेटल क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव होता. तर आयटी शेअर्समध्ये खरेदीची नोंद झाली.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आर्थिक आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकल्यास, बजाज फायनान्सचा शेअर सर्वात जास्त घसरला. बजाज फिनसर्व्हला 1 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.
महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सुमारे 2 टक्के आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी घसरले. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सुमारे दीड टक्क्यांनी घसरले
दुसरीकडे, भारती एअरटेलचे शेअर्स सुमारे 1.75 टक्के तेजीत होते. एचसीएल टेक आणि विप्रोचे शेअर्सही प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढले. आयटी शेअर्सच्या वाढीमुळे आज बाजारातील घसरणीला आळा बसला. टीसीएस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आयटी क्षेत्रातील मोठ्या शेअर्सपैकी फक्त इन्फोसिसला नुकसान झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत