सोनी कंपनीने Sony Bravia XE OLED ही स्मार्ट टीव्ही मालिका केली भारतात लाँच.

ही एक प्रिमीयम सिरीज असून ३,३९,९९० रुपयांपासून सुरू होते. सोनीने ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन आकाराचे दोन टीव्ही सादर केले आहेत. या Sony TV मध्ये कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR आणि नवीन OLED पॅनल देण्यात आलं आहे. सोनीच्या या OLED टीव्हीमध्ये 120fps वर 4K सपोर्टसाठी HDMI 2.1, VRR, ALLM आणि Auti HDR टोन मॅपिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत. देशात लाँच झालेल्या या लेटेस्ट सोनी स्मार्ट टीव्हीच्या किंमतीसह आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ..
Sony Bravia XR Master Series A95L OLED TV मध्ये सीमलेस एज डिझाइन आहे. या सोनी टीव्हीसोबत अॅल्युमिनियम एज स्टँड देण्यात आला आहे. हे टीव्ही ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन आकारात उपलब्ध करण्यात आले आहेत. हा Sony TV OLED (QD-OLED) (3840 x 2160 pixels) 4K 100 Hz डिस्प्लेसह येतात. या लेटेस्ट Sony TV मध्ये लाइट/कलर सेन्सर प्रदान केले आहेत. हे टेलिव्हिजन HDR10, HLG, डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतात. यामध्ये कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर उपलब्ध आहे. Sony Bravia XR Master Series A95L OLED TV मध्ये ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM) आणि व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR) सपोर्ट आहे. हे टीव्ही BRAVIA Sync, XR संरक्षण PRO, BRAVIA CAM, BRAVIA CORE PureStream सह येतात. याशिवाय या प्रीमियम टीव्हीमध्ये XR 4K अपस्केलिंग, XR सुपर रिझोल्यूशन, XR TRILUMINOS Max, XR स्मूथिंग, लाइव्ह कलर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कॉन्ट्रास्टसाठी, हे Sony स्मार्ट टीव्ही XR OLED Contrast Pro, XR HDR Remaster, Dynamic Contrast Enhancer, Pixel Contrast Booster सारख्या फीचर्ससह येतात. या टीव्हीमध्ये 20 W + 20 W + 10 W + 10 W ऑडिओ आउटपुट आहे. ५५ इंच स्क्रीन टीव्हीचे वजन १७.६ किलो आहे तर ६५ इंच स्क्रीन टीव्हीचे वजन २३.४ किलो आहे.
५५ इंच स्क्रीन असलेल्या XR-55A95L मॉडेलची किंमत ३,३९,९९० रुपये आहे. तर ६५ इंच स्क्रीन असलेला XR-65A95L टीव्ही ४,१९,९९० रुपयांना मिळतो. मर्यादित कालावधीसाठी, Sony या TV च्या खरेदीवर BRAVIA Cam मोफत देत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत