नळदुर्ग येथील भ्रष्टाचाराची कीड लागलेली एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास निर्मूलन योजने अंतर्गत बांधलेले घरकुले कोसळली

पहिल्याच पावसात घरकुलातील लाभार्थी रोडवर नगर प्रशासनाने नोटीस देऊन जखमीवर मिठ चोळले

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे बारा वर्षांपूर्वी केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास निर्मूलन [ lHSDP ] योजने अंतर्गत बांधण्यात आलेली घरकुल योजना हे एकदम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आल्याने तत्कालीन मुख्याधिकारी नगर अभियंता काही माझी पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून आज प्रकरण कोर्टात चालू आहे परंतु हे घरकुल योजना गोरगरीब जनतेच्या विकासासाठी होती परंतु नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भ्रष्टाचारांची कीड लागलेली दिसून आली
केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास निर्मूलन योजने अंतर्गत ही घरकुल योजना प्रभावी पणे राबवायला पाहिजे होती परंतु नगर प्रशासनाने आणि तत्कालीन मुख्याधिकारी नगर अभियंता काही पदाधिकारी आणि कंपनी यांनी कसली ही गरिबांची काळजी न करता स्वतःची पोळी भाजून घेण्याचे प्रभावी काम केले आहे यांच्या या खोडसाळ पणामुळे या घरकुल योजने पासुन वंचित आहेत . जे नागरीक घरकुलात राहातात आसे घरकुल चक्क कोसळली आहेत तरीही नागरिक घरकुल सोडायला तयार नाहीत . केवळ तत्कालीन मुख्याधिकारी अभियंता आणि पदाधिकारी आणि कंपनी या योजनेला जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे
आजची परिस्थिती नागरिकांचे खूप हलक्याची असल्याने जागा विकत घेणे आणि घरकुल बांधकाम करणे हे परवडणारे नाही गरीबांची आजची परिस्थिती आहे ते कुटुंब खाण्या पिण्याला मोताज आहे .
लाभार्थी पडक्या घरकुलातच राहुन आपला जीव मुठीत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत तरी ही आज जे लाभार्थी या घरकुलात राहतात अशा लाभार्थ्यांना नगर प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे की तात्काळ हे घरकुल निकृष्ट दर्जाची झालेली आहेत घरकुलाचे ऑडिट सुद्धा झालेल आहे तुम्ही घरकुले तात्काळ खाली करा अशा पद्धतीची नोटीस देऊन नगरपालिकेने दिन दलितांच्या गरिबांच्या दुःखावर मीठ चोळले आहे .
अनेक वर्ष झाले नळदुर्ग शहरात जे नागरिक गेल्या ७० ते ८० वर्षापासून कोणी पत्र्याचे शेड तर कोणी कच्च्या मातीचे घर बांधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी करत आहेत ज्या नागरिकांना जागा ही नाही आणि घर ही नाही आशा नागरिकांनी करायचे का हा खूप मोठा प्रश्न नागरिकासमोर भेडसावत आहे परंतु नगर प्रशासनाला किंवा वरिष्ठांना या गरीब कुटुंबाची कसलीही दया मया आलेली नाही अनेक वेळेस आंदोलने झाली उपोषणे झाली अनेक वेळेस निवेदने ही दिली तरी ही नगर परिषदेला व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना गरीब नागरीक या योजनेपासून वंचित आहेत वंचित असलेल्या लाभार्थ्यांकडे अधिकारी जातीने लक्ष देत नाहीत .
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या घरकुल आवास योजना राबवल्या जातात परंतु या योजना स्वतःची जागा नसल्याने जे नागरिक शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहतात अशा लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर देण्याकरिता प्रशासनाकडे खूप मोठा पाठपुरावा केला होता परंतु नगर प्रशासन वरिष्ठाकडून या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे नळदुर्ग शहरांमध्ये जी एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास निर्मलन योजने अंतर्गत जे घरकुल बांधकाम झालेले आहेत ते ही घरकुल निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामध्ये खूप मोठा गैर व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे यामुळे घरकुल योजनेचा तीन तेरा नऊ अठरा झाल्या आहेत
या योजनेला आपल्याच माणसाने भ्रष्टाचाराची कीड लागल्याने हे घरकुल जमीन दोस्त झाले आहेत याला जबाबदार तत्कालीन मुख्याधिकारी कंपनी आणि पदाधिकारीच आहेत आता तरी नगरपालिकेने या गरीब दलित जनतेकडे जातीने लक्ष देऊन त्या योजना प्रत्येकाना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा आता तरी प्रशासनाला या गोर गरीब जनतेची किव आली पाहिजे आणि जाग ही आली पाहिजे जे लाभार्थी या कोसळलेल्या घरांमध्ये राहतात त्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे .
याचे खापर नागरीकांच्या माथ्यावर फोडूनये
जे लाभार्थी विविध घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही आणि जागा ही नाही आसे लाभार्थ्याने जायचे कुठे या पद्धतीचा प्रश्न आजच्या लाभार्थ्यांना भेडसावत आहे नगर पालिकेने तात्काळ या गोष्टीचा विचार करून संबंधिताला त्यांचे हक्काचे पक्के घर बांधकामा साठी जागा नियमाकुल करून द्यावी अशी मागणी नळदुर्ग शहराततुन जोर धरत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत