धर्मानंद दामोदर कोसंबी
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी. (जन्म : ९ ऑक्टोबर, १८७६ -मृत्यू : ४ जून, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.
जन्म :-
धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला. गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती.
कार्य :-
गोव्यातले धर्मानंद कोसांबी हे आधुनिक काळातील पाली आणि अर्धमागधीचे आणि बौद्ध साहित्याचे बिनीचे अभ्यासक होते. बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या ओढीने ते त्यांच्या गोव्यातल्या मूळ गावापासून थेट वाराणशीपर्यंत रेल्वेच्या रुळांच्या बाजू- बाजूने चालत गेले, तिथे पाली आणि अर्धमागधी भाषांचा अभ्यास करून त्यांनी मूळ बौद्ध साहित्य वाचले. मग तिबेटला जाऊन बौद्ध धर्माचा अधिक सखोल अभ्यास केला आणि त्यावर मोठ्या कळकळीने पुस्तके लिहिली. त्यांना भारताच्या इतिहासाचा आणि त्यातील बौद्ध धर्माच्या भूमिकेचा खोल समज होता. गोव्यातल्या गाव समाजांच्या नैसर्गिक संसाधनांच्या गावकरी व्यवस्थेची त्यांना जाणीव होती आणि त्यांनी या व्यवस्थेतून निसर्ग कसा संयमपूर्वक सांभाळला गेला होता हे समजावून सांगितले आहे.
ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वीही प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते, हे होय. अद्भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मुळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषतः धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून काढण्याचा प्रयत्न केला.
प्रकाशित साहित्य :. जातककथा अनेक भाग, मराठी बुद्धकथा,
निवेदन, मराठी आत्मचरित्र
भगवान बुद्ध इ.स. १९४०, मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित) बुद्धचरित्रात्मक ग्रंथ, बोधि-सत्त्व (नाटक) मराठी
नाटक,
विसुद्दीमग्ग पाली
पाली ग्रंथ
सारांश:- बोधीसत्त्व नाटकाचे लेखन ही मोठीच सांस्कृतिक कामगिरी धर्मानंद कोसंबी यांनी बजावली आहे.त्यांचे हे कार्य विलक्षण आहे.आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे प्रगल्भ चिंतन-लेखन कालातीत आहे. असे चिंतन काळसापेक्ष ठरते. तुलनात्मक लेखन करत असताना निःपक्षपाती लेखन दुर्मीळच आढळते पण आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे भाष्य समर्पक ठरते. काळाच्या कसोटीवर उतरणारे प्रभावी नाटककार म्हणून धर्मानंद कोसंबी यांच्या कडे पाहता येईल. तत्कालीन परिस्थिती आपल्या संवादातून मांडण्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यशस्वी ठरतात. काळाच्या पुढे पाहणारा नाटककार म्हणून बौद्ध साहित्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे अढळ स्थान आहे.हिंदू धर्मात प्राचीन काळचे यज्ञयाग, त्यानंतरच्या स्मृतींतून व्यक्त झालेलें कर्मकांड आणि वर्णाश्रम धर्माचा विस्तार, त्या बरोबरच उपनिषद् काळापासून चालत आलेली तत्त्वज्ञानाची चर्चा आणि आत्म्यापरमात्म्याचा शोध या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यांतूनच पुढें योगमार्गाची साधना उत्पन्न होऊन तिला हठयोग आणि राजयोग असे दोन फाटे फुटले. पुढे मंत्र आणि तंत्र यांचे प्रस्थ माजलें. व्रतें आणि उत्सव यांचे मोठें अरण्य फोफावलें आणि हिंदुधर्म म्हणजे एक महाकांतार होऊन बसला.या सर्व जटिलतेमधून धर्मतत्त्वांना वाचविण्याचें काम भगवान बुद्ध ,भगवान महावीर यांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या साधुसंतांनी केले.
आत्मविकासाला बाधक अशा वासनांवर विजय मिळवावा, सदाचारानें चालावें, अहंकाराचा नाश करावा, समाजाची बिघडणारी घडी त्यागधर्म आणि दानधर्म यांच्या द्वारा सुधारत जावी आणि पंचशील तत्त्वांचे पालन करून जीवनाचे सार्थककारावे हाच बौद्ध धर्माचा गाभा होय. वर्णव्यवस्थेनें समाजांत उच्चनीच भाव उत्पन्न केला आणि व्यक्तीचें जीवन एकांगी केलें. आणि जातिभेदानें तर समाजाचे तुकडेच पाडले. यांचा थोडाफार विरोध या सर्व सुधरकांनी केला.
हीच परंपरा सध्याच्या काळी बोधी रंगभूमी करीत आहे. बोधी म्हणजे पूर्णज्ञान; आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठीं जो अविश्रांत प्रयत्न करणारा सत्त्व म्हणजे प्राणी, तो बोधिसत्व होय. अत्यंत प्राचीन कालीं हे विशेषण गोतम बुद्धाला त्याच्या जन्मापासून ते त्याला सम्बोधि प्राप्त होईपर्यंत लावीत असत, असें नालक सुत्ताच्या वत्थुगाथांवरून दिसून येते. त्या बोधिसत्वाच्या जीवनचरित्राची त्रिपिटक ग्रन्थाच्या आधारें रूपरेषा आखण्याच्या उद्देशानें बोधीसत्त्व हे नाटक लिहिलें आहे.बोधीसत्त्व हे तथागत गौतम बुद्धचरित्र व सम्यक संबुद्धांच्या विचारांचा वेध घेणारे प्रभावी नाटक आहे.
[【संदर्भ]】*:-
1.जातककथा 5 2.बुद्धकथा
3.भगवान गौतम बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
4.बोधि-सत्त्व (मराठी नाटक)
5.विसुद्दीमग्ग : पाली ग्रंथ
6.भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी:
डिंगणकर, डॉ मधुसूदन ,नचिकेत Yप्रकाशन,नागपूर.
7.आचार्य धर्मानंद कोसंबी
आत्मचरित्र: गोवा हिंद असोसिएशन 8.”धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र”
9.बोधी : कला-संस्कृती: प्रेमानंद गज्वी
10.भारताचा सांस्कृतिक इतिहास: रा. वि. ओतुरकर
11.प्राचीन भारताचा Government इतिहास: र. ना. गायधनी Hhh
12.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म: डॉ. बी.आर. आंबेडकर(आवृत्ती १९७०)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत