प.महाराष्ट्र

पुणे PMPL मध्ये Google Pay ने काढता येणार तिकीट.

पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक चांगला होणार आहे. पुणे शहरात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आरामदायी प्रवाशांचा अनुभव येणार आहे. तसेच बस कुठे आहे? हे सुद्धा कळणार आहे.
पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचा विस्तार आणखी वाढवण्यात येणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस येणार आहेत. त्यासोबत आता गुगलवर पीएमपीची बस कुठे आहे? हे कळणार आहे. तसेच पीएमपीचे तिकीट ऑनलाईन काढता येणार आहे

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदाची सूत्र घेतल्यापासून बदल सुरु केले आहे. त्यांनी प्रवाशांसाठी अनेक चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु केली आहे. आता पीएमपीसोबत गुगलचा करार झाला आहे. या करारानंतर गुगलला हवी असणारी माहिती देण्यात आली. यामुळे आता १४ पीएमपी बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहे. तसेच गुगलवरुन लाईव्ह लोकेशन मिळण्यासाठी चाचणी सुरु केली आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करता येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे पीएमपीची बस कुठे आहे? हे प्रवाशांना घरबसल्या समजणार आहे.

पुणे शहरात पीएमपी बस सेवेच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख जण प्रवास करतात. या सर्वांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे ‘पीएमपी’कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस घेण्यात येणार आहे. त्यासाठी या महिन्यात १९२ बसेस दाखल होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!