बदलत्या युगातही अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जीव घेणाऱ्या बुरसटलेल्या परंपरा सुरूच आहेत.

एका बाजूला आपण अभिमानाने सांगतो की आज विज्ञानयुग आहे, जग किती बदललं आहे, माणसाच्या जीवनाला विज्ञानाने किती नवी दिशा दिली आहे. पण विरोधाभास असा की या बदलत्या युगातही अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जीव घेणाऱ्या बुरसटलेल्या परंपरा सुरूच आहेत.
कर्नाटकातील अनंतपूर गावात बनावट रामपाल महाराजाच्या आशीर्वादाने तब्बल २० भाविक महापूजा करून देहत्याग करणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे वास्तव म्हणजे समाज अजूनही किती मागे आहे याचं जिवंत उदाहरण आहे.
आपल्या समाजात कालानुरूप सुधारणा झाल्या. सतीप्रथा बंदी, बालविवाह प्रतिबंध यासारख्या कायद्यांनी सामाजिक बदल घडवले. डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी उभं केलेलं कार्य आणि राज्यात अस्तित्वात असलेला जादूटोणा विरोधी कायदा याचं महत्त्व इथे अधोरेखित होतं.
धर्म पाळणं, पूजा-अर्चा करणं चुकीचं नाही, पण श्रद्धेच्या नावाखाली मानवी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रथा, भोंदू बाबांचे आदेश आणि आंधळेपणाने होणारी बलिदानं हा मानवतेला कलंक आहे.
आज परिस्थितीने गांजलेले लोक सहज अशा भोंदूंच्या जाळ्यात अडकतात. गर्दीचं मानसशास्त्र नेहमी स्वप्न दाखवणाऱ्याकडे खेचलं जातं. दाखवलेली स्वप्नं प्रत्यक्षात साकार होत नसली तरी एखादं उदाहरण समोर करून भक्तांना गुंगवण्यात ते यशस्वी होतात आणि अशा रीतीने समाजाची दिशाभूल होते.
श्रद्धा ठेवायची तर ती मानवतेवर ठेवा, आपल्याकडे अजूनही अंधश्रद्धा माणसांच्या जीवाशी खेळते आहे, त्यामुळे सुधारणा अपुरीच आहे. आता या सुधारणेच्या लढ्याला पुन्हा वेग देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे.
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar Shashikant Shinde Rohit Rajendra Pawar Supriya Sule @highlight Hamid Dabholkar
अंधश्रद्धामुक्तसमाज #डॉदाभोळकर #जादूटोणा_कायदा #भोंदूबाबा #मानवता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत