जागतिक अन्न सुरक्षा दिवस


@ ७ जून @
७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला.
हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारला होता.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे. संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना
आणि जागतिक आरोग्य संघटन ला जगभरातील अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी नियुक्त केल्या आहेत.
अन्न सुरक्षा का आवश्यक आहे आणि ती कशी मिळवता येऊ शकते? यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत.
सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केले पाहिजे.
कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धती राबविण्याची गरज आहे.
व्यावसायिकाने अन्न पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी.
सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार मिळविण्याचा हक्क आहे.
सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याच बरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स विकसित केले आहेत.
या निर्देशकांच्या माध्यमाने अन्न सुरक्षेच्या पाच निकषांवरील राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. या श्रेणी मध्ये खालील निकषांचा समावेश आहे.
⭕मानव संसाधन आणि संस्थात्मक व्यवस्थापन अंमलबजावणी,
अन्न चाचणी पायाभूत सुविधा आणि देखरेख.
⭕प्रशिक्षण आणि क्षमता वाढविणे.
⭕ग्राहक सशक्तीकरण.
⭕एका अभिनव आणि बॅटरीने चालणारे रमन १.० नावाच्या डिव्हाईस ला बाजारपेठेत आणले आहेत.
हे डिव्हाईस एका मिनिटापेक्षा कमी वेळेत खाद्य तेल, चरबी आणि तुपामधील केलेली भेसळ शोधण्यात सक्षम आहे.
⭕शाळांकडे अन्न सुरक्षेचा मुद्दा नेण्यासाठी
‘फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स’
नावाच्या नव्या समाधानाची सुरुवात केली गेली आहे.
⭕या किट मध्ये स्वतःच अन्न मध्ये भेसळ असल्याची तपासणी करण्यासाठी मॅन्युअल आणि एक डिव्हाईस लागले आहे.
⭕एफ.एस.एस.ए.आय.(F.S.S.A.I.) ने विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यस्थळे, संरक्षण आणि अर्ध-सैन्य प्रतिष्ठान, रुग्णालये, कारागृह सारख्या
७ संकुलांना
‘ईट राइट कॅम्पस’ म्हणून घोषित केले आहे.
⭕एफ.एस.एस.ए.आय.(F.S.S.A.I.) ने अन्न कंपन्या आणि व्यक्तींचे योगदानाला ओळख देण्यासाठी ‘ईट राइट अवार्ड’ ची स्थापना केली आहे. जेणे करून नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यासाठी अन्न निवडण्यामध्ये सशक्त बनवणे.
अन्न वाया घालवू नका.
आपल्याला जेवढे लागते तेवढेच घ्या. ‘आज मी पोटभरून जेवण केलं,
नाहीतर आज मी उपाशी राहिलो असतो’
हे ज्याला कळलं तो कधीही अन्नाची नासाडी करू शकत नाही,
कारण त्याला त्या अन्नाच महत्व कळलेलं असतं.
अन्न हेच पूर्णबह्म. चला स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांना प्राधान्य देऊ.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत