मराठवाडा

छत्रपती शंभाजीनगर मध्ये आज राज्य मंत्रिमंडळ बैठक.

मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर सजविण्याची एका बाजूला घाई सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंधरा मोर्चे निघतील.
मराठवाडय़ातील ७५ नगरपालिका आणि नगरपंचायतीपैकी ३४ नगरपालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सरासरी चार ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पावसाने दांडी मारल्याने पिकांची दुरवस्था झाली आहे. ५० टक्के खरीप हंगाम हातचा गेला आहे. सरासरी दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अशा प्रदेशातील विकासासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाचे ढोलताशे जोरदारपणे वाजविले जात आहेत.

अनेक नगरपालिकांमध्ये पाणी पुरवठय़ाची मोठी अडचण होणार असल्याचे अहवाल मंत्रीमंडळसमोरही ठेवण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली वगळता मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासू शकते, असा अंदाज आहे. मराठवाडय़ात सध्या ८६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शु्क्रवारी काही भागात पाऊस झाला तरी धरणसाठय़ात वाढ होईल एवढा तो अधिक नाही.

मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित या नगरपालिकांमध्ये चार ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा

   कन्नड, गंगापूर, खुलताबाद, जालना, माजलगाव, धारूर, आष्टी, पाटोदा, अहमदपूर, जळकोट (चार दिवसांआड पाणीपुरवठा)
  अंबड, गंगाखेड, वसमत, औसा, शिरूरअनंतपाळ, रेणापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग (पाच दिवसांआड पाणीपुरवठा)
  शिरूरकासार (सहा दिवसांआड पाणीपुरवठा)
  भोकरदन, बदनापूर (सात दिवसांआड पाणीपुरवठा)
  बीड, जाफराबाद, उमरगा, लोहारा (आठ दिवसांआड पाणीपुरवठा)

बैठकीवर कोटय़वधींची उधळपट्टी- पटोले
मराठवाडय़ात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवणे म्हणजे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यापूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘सुभेदारी’ या विश्रामगृहात मुक्काम केला होता असे पटोले म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!