देशात मागासवर्गीयांच्या 40 हजार संघटना का ?

देशात मागासवर्गीयांच्या संघटना 40 हजार आहेत असे सांगितले जाते , मागासवर्गीय लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना निर्माण करण्याची काय गरज पडली ?
प्रत्येक संघटनेच्या नेत्यांना वाटते की, माझ्या इतका शहांना कोणीच नाही ! सर्वांनी माझंच नेतृत्व स्वीकारले पाहिजे, असे म्हणून तो संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सूत्रे तो विसरतो . डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या पक्षाचा नेता हा इतर पक्षांतील नेत्यापेक्षा काकणभर सरस असावा. तेव्हा संघटना निर्माण करणार्यांने इतर पक्षांतील केंद्रीय कार्यकारिणीच्या नेत्यांची शैक्षणिक पात्रता तपासून पाहिले पाहिजे, त्यांची सल्लागार समितीच्या लोकांची शैक्षणिक पात्रता तपासून बघितले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला 10 वकील 20 डॉक्टर, 30 इंजिनिअर पाहिजेत तेव्हा संघटना निर्माण करणार्यांने विचार करणे आवश्यक आहे की, माझ्या संघटनेत 10,20,30 च्या पात्रतेचे लोक आहेत काय? संघटनेत सल्लागार समिती आहे काय?
अशा प्रकारच्या कोणत्याही बाबींचा विचार न करता उठ सूट कोणीही संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो व समाजाने माझ्या संघटनेचे सदस्य व्हावे म्हणून अपेक्षा करतो , तेव्हा जनताही विचार करून जिकडे वाट मिळेल तिकडे पळतो , ज्या पक्षाकडून जे मिळेल ते घेण्याच प्रयत्न करतो , याला जनता जबाबदार नसून उठ सूट कोणीही संघटना बांधण्याचा प्रयत्न करणारा जबाबदार आहे , तेव्हा समाजातील कोणत्याही व्यक्तीने संघटना निर्माण न करता ज्या संघटनेचे नेतृत्व हे IIT, MD LLM,LLD व ज्या संघटनेत IAS लोकांची सल्लागार समिती आहे त्या संघटनेत काम केले पाहिजे. आणि ज्या संघटनेचे नेतृत्व हेIIT,MD, LLD नसेल त्या त्या संघटना विसर्जित करून जनतेचा सत्यानाश थांबविले पाहिजे.
इंजि. अनंत खोब्रागडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत