तथागत बुद्धांनी सांगीलेली 38 प्रकारची उत्तम मंगल कर्म:

1.मुर्खांची संगती करु नये.
2.बुद्धिवंतांची संगती करावी.
3.शीलवंताची संगति करावी.
4.अनुकूल ठिकाणी निधवास करावा.
5.कुशल कर्मांचा संचय करावा.
6.कुशल कर्म करण्यात रत होणेे.
7.अधिकाधीक ज्ञान संचय करणे.
8.तंत्रविद्या ( Work Of Art ) शिकणे
9.व्यवहार कुशल आणि विनंम्र होणे.
10.विवेकशील होणे.
11.सुंदर वक्ता होणे.
12.माता-पिता यांची सेवा करणे.
13.सहचारिणी,पुत्र-पुत्री यांचे पालन
पोषण करणे.कर्मों
14.अकुशल कर्म न करणे.
15.निरपेक्ष भावनेने (कोणतीही अपेक्षा न
करता ) दान देणे.
16.धम्म पालन-आचरण करणे
17.सगे-संबंधी यांचा आदर सत्कार
करणे.
18.कल्याणकारी कार्य करणे.
19.काया-वाचा-मनाने दुस-याला पीड़ा
होईल असे कार्य न करणे.
20.नशील्या पदार्थांचे सेवन न करणे.
21.धम्म कार्यात तत्पर रहाणे.
22.गौरवशाली व्यक्तिमत्व बनवणे.
23.विनंम्र स्वभाव बनवणे.
24.पूर्ण रूपाने संतुष्ट अर्थात तृप्त होणे.
25 कायम कृतज्ञभाव ठेवणे.
26.वेळो-वेळी धम्म चर्चा करणे.
27.क्षमाशील होणे.
28.आज्ञाकारी होणे.
29 भिक्खुंचे अथवा शीलवंत लोकांचे
दर्शन करणे.
30.मनास एकाग्र करणे.
31.मनास निर्मळ करणे.
32.सतत जागरूक अर्थात सजग असणे.
33.पाच शीलांचे पालन करणे.
34.चार आर्यसत्यांचें दर्शन करणे.
35.आर्य अष्टांगिक मार्ग अंगीकारणे.
36.निर्वाणचा साक्षात्कार करणे.
37.लोक धम्म:लाभ-हानी, यश-अपयश,
सुख-दुख,जय-पराजय या पासून
विचलित न होणे.
38.शोक विरहित,निर्मळ आणि
निर्भय होणे.
38 मंगल कर्मांचे पालन केल्यास
जीवनात येणारी दुःख्खे आणि
अडचणी (परेशानियां) दूर होतील.
( संदर्भ: सुत्तनिपात- खुद्दकनिकाय)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत