दलित वस्तीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात रेती ऐवजी डस्टचा वापर.
चांदूर रेल्वे शहरातील दलित वस्तीमध्ये होत असलेल्या कामामध्ये अनेक भागात रेतीचा वापर कमी करून डस्ट मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते करीत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मिलिंद नगर मध्ये सुरू असलेला सिमेंट काँक्रीट रस्ता हा दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर करण्यात आला होता त्या कामाचे बांधकाम सुरू करण्यात आले परंतु संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम करीत असताना रेती कमी व डस्ट चा वापर जास्त प्रमाणात करीत असल्यामुळे संबंधित काम नागरिकांनी बंद पाडले बंद पाडल्यामुळे संबंधित कंत्रालदाराने नागरिकांवर अरेरावीची भाषा वापरून धमकी देण्यात आल्याचे नागरिकांनी आपल्या निवेदनात म्हटले असून काम करीत असताना सदर कामांमध्ये अनेक ठिकाणी अनिमित्त असल्याचे दिसून येत ॥ आहे. यापूर्वी सुद्धा दलित वस्तीमध्ये अनेक सिमेंट काँक्रीट रस्ते झाले परंतु रस्त्यामध्ये अनिमित्त असल्यामुळे व डस्ट चा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे संबंधित रस्ते आताच उखडून गेले आहेत. संबंधित कामाची योग्य ती कार्यवाही करून संबंधित नागरिकांना न्याय देण्याची मागणी जिल्हाधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी समाज कल्याण आयुक्त समाज कल्याण अमरावती यांच्याकडे निवेदन देण्यात आले . आहे. दलित वस्तीतील निकृष्ट दर्जाचे कामे करून मलिदा लाटण्यासाठी कमिशनच्या हव्यासापोटी सदर प्रकार करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी निलेश घणे, शेख सलीम, शेख वसीम, गफार कुरेशी, विजय सरदार, प्रकाश गजभिये, नूरखा पठाण, भगवान दुर्योधन, पप्पू खडसे, मीना आठवले, गोलू कुरेशी यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत