दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

१२ मे – जागतिक मातृत्व दिन

जागतिक मातृत्व दिन (Mother’s Day) हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो.

आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव आणि आयुष्याची शिदोरी वैगेरे वैगेरे. हे सगळं आठवतं जेव्हा आईबद्दल काहीतरी लिहायचं असतं तेव्हा. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. पण, आई बद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जगभरातील सर्व महिलांसाठी ज्या आई झाल्या आहेत. ज्यांनी मानव या प्रजातीतील प्रत्येकाला सृष्टीत जन्म दिला आहे; तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते अशा प्रत्येक स्त्रिसाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन. मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अमेरिकन अ‍ॅक्टिविस्ट अ‍ॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आई सोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अ‍ॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. ‘मदर्स डे’ साजरा करण्याच्या पद्धती व्यक्ती, संस्था आणि समाजपरत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरं आदिंचा समावेश असतो. तर, काही लोक आर्थिक रुपात, किंवा वस्तू रुपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्याची भावना ही ज्याच्या त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!