निलेश माझ्या नादी लागू नकोस महाराष्ट्रात जे कोणी माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय; तुझा असा कंड जिरवेन की … – अजित पवार यांचा निलेश लंके यांना जाहीर सभेत असभ्य भाषेत दम.

आमदार असलेल्यांना भर सभेत ही भाषा तर केबिन मध्ये सामान्य माणसाला कशी वागणूक देत असतील ?
लोकसभा 2024 च्या प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. निवडणूक आयोगाची कसलीही भीती किंवा अस्तित्व नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जाहीर सभांमधून अशी वक्तव्य होत असल्याने जनते मध्ये कमालीची नाराजी व संभ्रम निर्माण होतो आहे. असेच एक वक्तव्य काल महाराष्ट्रात आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित असलेल्या अजित पवार यांनी केले.
“महाराष्ट्रात माझ्या नादी लग्नाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय !” निलेश लंके ‘तू किस झाड की पत्ती है’ असं म्हणत अजित पवार यांनी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना थेट धमकी दिली आहे. अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार्थ पारनेर इथं अजित पवार बोलत होते.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. मागच्या वेळी निलेशला तिकीट देऊन चूक झाली. अगोदर हा गरीब वाटला. नंतर समजलं हा गुंड पाठवून लोकांना त्रास देतो. कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप बनतो, निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्तर आहे. तू आता आमदार नसुन, कॉमनमॅन झालाय. तुझा कंड कसा जिरवायचा हे मला चांगलं माहीत आहे. असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांना सुनावलं आहे.
आपल्या भाषणात अजित पवार यांनी निलेश लंके यांना चांगलच सुनावलं आहे. निलेश माझ्या नादी लागू नकोस महाराष्ट्रात जे कोणी माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय, मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यास तर मी तुझ्या मागे लागेन. ग्रामीण भागात एक शब्द आहे. कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला डोळ्यासमोर सारखा अजित पवार दिसेल. अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला आहे. आता तो आमदार नाही, त्यामुळे त्याची अरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करु नये, आता कोणी अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं आवाहनही अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.
लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही, लंकेचं पार्सल घरी पाठवण्याचं काम करायचं असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
यावर निलेश लंके काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत