बार्शी येथील मुंबई प्रांतिक परिषद शतकपूर्ती सन्मान परिषद, सोलापूर


बार्शी येथील मुंबई प्रांतिक परिषद शतकपूर्ती सन्मान परिषद, सोलापूर
सप्रेम जय भीम
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला, जि. नाशिक येथे भरलेल्या ‘अखिल मुंबई इलाखा परिषदे’त आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली ‘मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे मी माझे दुर्देव समजतो, पण मी अशी प्रतिज्ञा करतो की मी हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही.’ ही घोषणा सर्वश्रुत आहे. त्यामुळे येवले परिषद हीच धर्मांतर निर्णय परिषद मानली जात आली आहे. परंतु त्या परिषदेच्या तब्बल अकरा वर्षे अगोदर १० मे १९२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक परिषदेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच ‘अस्पृश्यांच्या उद्धारासाठी धर्मांतर हाच पर्याय आहे,’ हा विचार आणि त्याचे विश्लेषण जाहीर केलेले दिसून येते. या परिषदेतील या ऐतिहासिक भाषणातून, अस्पृश्यांच्या उत्थानासाठी ते ‘देशांतर, नामांतर आणि धर्मांतर’ या तीन पर्यायांवर विचार मांडतात आणि धर्मांतर हाच पर्याय कसा उपयुक्त आहे ते सांगून हिंदू धर्म त्यागून अन्य धर्मात प्रवेश करण्याची भूमिका मांडतात.
या ऐतिहासिक परिषदेस व बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार पहिल्यांदाच मांडलेल्या भाषणास या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या रोमांचकारक आणि प्रेरणादायी ऐतिहासिक भाषणाचे स्मरण आणि माहिती शतकोत्तर कालखंडातील तरुणाईला व्हावी या उद्देशाने ही ‘शतकपूर्ती सन्मान परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
- उद्घाटक – मा विष्णु कांबळे (माजी शिक्षणाधिकारी)
- प्रमुख वक्ते – मा. प्रा.डॉ.टी. एस. मोरे
(माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय बार्शी, सोलापूर)
मा.प्रा.डॉ.एम.डी. शिंदे
(माजी हिंदी विभागप्रमुख, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर)
मा.प्रा.एम.आर. कांबळे
(ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत)
- अध्यक्ष मा. दत्ता गायकवाड (ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व लेखक)
तरी कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !
- संयोजक *
सुधीर चंदनशिवे, सुजित हावळे, सौ. सुनिता गायकवाड, प्रा.डॉ. अंजना गायकवाड, सुनिल आवारे, सौ. जयश्री रणदिवे, प्रा.डॉ. वनिता चंदनशिवे, सौ. सुचित्रा थोरे, सौ. शिला हावळे
- बार्शी येथील मुंबई प्रांतिक परिषद शतकपूर्ती सन्मान परिषद, संयोजन समिती, सोलापूर •
शुक्रवार, दि. १० मे २०२४, सायं. ६-३० वा. स्थळ-डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत