कायदे विषयकनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पत्रकार श्री.अरुण अहिरराव कडून..!

1️⃣➡️ सदर लेख चांगला आहे,पण एकांगी आहे. केवळ एकतर्फी बीजेपीला झोडपून काढणार आहे. नंदुरबार लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघ निहाय ताज्या सर्वेक्षणाची थोक आकडेवारी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन अभ्यास करून दिली पाहिजे होती.
2️⃣➡️सन 2019 ची राजकीय परिस्थिती व मतदारांची मानसिकता व सन 2024 ची राजकीय परिस्थिती व मतदारांची मानसिकता यात खूप फरक आहे.कारण गेल्या पाच वर्षात तापी नदीतून खूप पाणी वाहून गेले आहे.
3️⃣➡️उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध समाजवादी नेते श्री.राम मनोहर लोहिया म्हणायचे की,”जिंदा कौम 5 साल तक राह नहीं देखती है।”प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जूने आकडे तसेच राहतील असे अजिबात नाही.तसे असते तर काँग्रेसच्या 414 जागा आजही तशाच्या तशाच राहिल्या असत्या.
4️⃣➡️ सन 2024 ची लोकसभा निवडणूक ही माननीय श्री.नरेंद्र मोदी साहेब नको की मोदी साहेब पाहिजे,याच विषयावर होणार आहे.म्हणजे मोदी समर्थक व मोदी विरोधक एवढाच मुद्दा आहे.हिंदू विरुद्ध गैरहिंदू अशी लढाई आहे.संविधान बचाव अशी लढाई आहे.मोदी सरकार हटाव व मोदी सरकार बचाव लढाई आहे.
5️⃣➡️मोदी साहेब पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून आलेत तर आपले आर्थिक व राजकीय भविष्य काय होईल या भीतीतून पैसा ओतला जाऊन मतदान होणार आहे.हिंदुत्वाचे सरकार नको म्हणून
गैरहिंदुत्व लोक मतदान करणार आहेत.कोण भ्रष्टाचारी व कोण राजा हरिश्चंद्र याला पाहून मतदान होणार नाही.कोण डॉक्टर हिना गावित?कोण डॉक्टर सुभाष भामरे? कोण स्मिता वाघ?कोण डॉक्टर भारती पवार? अशा उमेदवारांशी मतदाराला देणेघेणे नाही.गैरहिंदूंना- अहिंदूंना-नॉन हिंदूंना आजच्या मोदी सरकारचे कोणतेही चांगले व राष्ट्रीय हिताचे काम दिसणारच नाही व मोदी सरकारने या गैरहिंदूंना सोन्याची पत्रे जरी बसूवून दिलीत तरी ते मोदींना मत देणार नाहीत. कारण मोदी हिंदूंची बाजू घेतात.
6️⃣➡️आजच्या प्रत्येक मतदाराच्या हातात मोबाईल व सोशल मीडियाचा खरा खोटा खजिना हातात असल्यामुळे तुम्ही कोणतेही मतदाराला गुमराह करू शकत नाही व मेंढरांप्रमाणे वाहुन घेऊन जाऊ शकत नाही.गुमराह करण्याचे ही दिवस गेलेत.कोणत्याही विधानसभा मतदार संघातील वजनदार राजकीय नेत्यांनी व इतर मोठ्या कार्यकर्त्यांनी कितीही ढवळाढवळ करून पक्ष विरोधी कारवाया केल्यात तरी थोडाफार फरक पडेल,पण त्यामुळे जय पराजयात फरक पडणार नाही.
7️⃣➡️गुप्त मतदान असल्यामुळे आपली पत्नी व आपले घरचे लोक कोणाला मत देतील हे आपणही छातीठोकपणे सांगू शकत नाही.तेंव्हा एवढ्या मतदारसंघाचा अंदाज वर्तवणे अशक्य आहे.केवळ हवाबाजी व तिकडमबाजी करून मनोरंजन करता येईल.
8️⃣➡️ कोणी कितीही उड्या मारल्यात तरी शक्यतो श्री.नरेंद्र मोदी साहेबांचे सरकार येणार नाही,पण बीजेपीचे सरकार हमखास शंभर टक्के येईल.कारण 4 जूनला सर्व 543 जागांचा निकाल लागल्यानंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी (Single largest party) म्हणून बीजेपीचेच सर्वाधिक खासदार निवडून येतील. म्हणजे निवडून आलेल्या खासदारांच्या संख्यात्मक बाबतीत नंबर एक पक्ष हा बीजेपीच असेल.संविधानात्मक संकेतानुसार
[ conventions of the Indian constitution] राष्ट्रपती हे सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या प्रमुख नेत्यालाच प्रथम सरकार बनवण्यासाठी संधी देऊन पाचारण(बोलावणे) करु शकते.
9️⃣➡️भारतीय संसदेत पंतप्रधानाला बहुमतासाठी सभागृहात हजर@ एकूण खासदार÷ दोन+ एक= साधे बहुमत अशा खासदारांची जरुरी असते. विशेष बहुमत किंवा दोन तृतीयांश बहुमत लागत नाही.जर 100 खासदार असतील तर 51 विरोधात 49 असे साधे बहुमत असते.साधारणपणे म्हणजे निवडून आलेल्या 543 खासदारांमधून साधारण 273 खासदार लागतील. बीजेपी 400 पार नाही झाली व समजा बीजेपीचे 210-220-230 -240 असे खासदार निवडून आलेत,तरी ते 273 करू शकतात.
????➡️अशा परिस्थितीत मात्र मोदी व शाह सरकार मध्ये असतील किंवा नसतील हे सांगणे कठीण आहे.कारण बहुमताच्या जोडतोडसाठी गैरबीजेपीचे जे खासदार येतील ते टर्म व कंडिशन टाकतील.म्हणून मोदी व शहा यांना वगळून बीजेपी आघाडीचे सरकार येऊ शकते.राजकारण हा शक्यताशक्यतेचा खेळ असल्यामुळे यात कोणतेही अंदाज खरे निघत नाहीत.
धन्यवाद????????
????????????????????????????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!