मोदींची वक्तव्ये म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री पदाला न शोभणारा वैचारिक दरिद्रीपणा – उध्दव बाळासाहेब ठाकरे गट

कणकवली : लोकसभा 2024 च्या प्रचाराला वेगळीच धार येत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे
काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रे खेचली जातील व हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांमध्ये केले जाईल’’, असे विखारी वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी करावे यासारखे दुर्दैव नाही. मासे खाणे, मटण खाणे यांसारखे आहार स्वातंत्र्याचे मुद्दे निवडणूक प्रचारात आणून मांसाहार करणाऱ्यांचा संबंध थेट मोगलांशी जोडणे हे तर वैचारिक दारिद्रयच म्हणायला हवे. देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही व निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही व निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत ठाकरे गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत