बहुजन विचारमंच, सोलापूर संचलित 21 बचत समूहांच्या 55 सभासदांनी मिळून वंचित बहुजन आघाडी ला दिला आर्थिक मदतीचा हात.


सोलापूर : आज दिनांक 2 मे 2024 रोजी सायंकाळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचारसभा अत्यंत दणक्यात पार पडली.
भाजपाला हरविण्यासाठी एससी, एसटी, ओबीसींचे, आदिवासींचे एकूणच बहुजनांचे, आरक्षणवादींचे तसेच मुसलमान बांधवांचे धृवीकरण होणे कसे गरजेचे आहे, यावर सांगोपांग चर्चा करून, मौलवींनी मुसलमानांना काँग्रसचे बटिक बनवल्याचा आरोप करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. तुमची मते काँग्रेसला दिल्याने भाजप हरणार नाही तर तुम्ही आरक्षणवादी पक्षाला मते दिल्याने भाजप हरणार आहे, असे ठामपणे ठणकावून सांगितले.
भाजप आणि काँग्रेसने एकाही मुसलमानाला तिकीट दिले नाही. कारण ते विचाराने एकच असून ते तुमच्या हितांचे अजिबात रक्षण करणार नाहीत, हे पक्के ध्यानात घ्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बहुजन विचारमंच, सोलापूर संचलित 21 बचत समूहांच्या 55 सभासदांनी जमा केलेला निधी वंचित बहुजन आघाडीच्या खात्यात आजच थेट जमा केला आहे. त्याचे प्रतीक म्हणून महिला सभासदांनी ₹ 76500/- ची चेकची प्रतिकृती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदान करून तन मन धनाने आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे सिद्ध केले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. बहुजन विचारमंचने एक सकारात्मक तसेच अनुकरणीय उपक्रम राबवून बहुजनांना प्रेरणा दिली आहे. नोट भी देंगे, व्होट भी देंगे ही घोषणा सार्थ केली आहे.
सर्व बचत समूहाच्या सभासदांनी जाणीवपूर्वक तसेच मोठ्या अभिमानाने, मानाने ही देणगी दिली आहे. त्या सर्वांचे हार्दिक आभार. आर्थिक विकास अभियान अंतर्गत बचत समूह देखील केवढी मोठी भूमिका बजावू शकतो, हा आत्मविश्वास, संदेश सर्वदूर गेला आहे.
हा निधी जमा करण्यात आयु. शाम शिंगे सर, आयु. रत्नदीप कांबळे सर यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सर्वच बचत समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भरीव कामगिरी बजावली आहे. आपणा सर्वांचे हार्दिक आभार.
आबासाहेब साबळे
अध्यक्ष
बहुजन विचारमंच, सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत