आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

‘बानाई’ चे आर्थिक क्षेत्रात दमदार पाऊल !

ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम

     दु:खाचे निदान आपण शोधावे. आपण ते द्यावे. समूहाने प्रथमोपचार करावा. आर्थिक दु:खे मोठी होत चाललीत. भवताल दिसायला लागली आहेत. 

परिणामी, नागपुरातील बौद्ध समाज नवी निदान केंद्रे द्यायला निघालाय. नवी आव्हाने तो पाहतोय. आंबेडकरी अंमल इथेही आहे हे त्याला कळलय. म्हणून, समूहाने तो निघालाय हे विशेष !

     'बोनस लाईफ' हे इथेय असा तो वळतो आहे. राजकीय शिवाय धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, धर्मादाय बरोबर आर्थिक क्षेत्रात लक्ष घालायची फार गरज असल्याचे त्याला पटले आहे. पूढची गडद आव्हानात्मक स्थिती कदाचित हीच असेल ! 

     याचमुळे जाणत्या बौध्दांनी ठोस पाऊल म्हणून नुकतीच 'बानाई क्रेडीट को-आपरेटिव्ह सोसायटी' नामक पतसंस्थेची निर्मिती केली. ही निर्मिती, व्यथित बौद्ध आणि इतर वंचितांच्या जीवनात हक्काचा हातभार असे निदान केंद्र होणार आहे. 

     तसेही, बौद्धांच्या जीवनात 'बानाई' हे आदरणीय 'ब्रॅंड' नाव आहे.

या बानाई पतसंस्थेचे कार्यक्षेत्र नागपूर शहर व जिल्हा राहणार आहे. सध्या ३१९३ सदस्यसंख्या असून ८४ लक्ष रुपये भागभांडवल गोळा झालेले आहे. पतसंस्थेची पहिली शाखा, उत्तर नागपुरातील बेझणबाग येथे उघडत आहे. येत्या ५ मे रोजी या शाखेचे उदघाटन ठरलेय. ही शाखा पूर्ण संगणकीय असणार आहे.

     बानाई ला खूप वर्षाची कल्याणकारी पार्श्वभूमी आहे. बानाई म्हणजे, 'बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (BANAE : बानाई)' 

या बानाई पतसंस्थेत अभियंते आहेत, याशिवाय इतर क्षेत्रातील नामवंत आहेत.

     सध्या एक वर्षाचा कार्यभार सांभाळायला 'कोअर टीम' तयार करण्यात आली. 

यात ११ संचालक, अनुप सांगोडे, अनिल बहादुरे, अरविंद गेडाम, अजय पोहेकर, अविनाश मेश्राम, प्रदीप नगरारे, विजय उमरे, शामदास चव्हाण, कविता ओरके, कविता भोवते व अमिताभ पावडे हे आहेत.
तज्ञ संचालक म्हणून राजेंद्र थुल व विजय खापर्डे हे आहेत.
याशिवाय राजू भिवगडे, सुधन ढवळे, रवींद्र जनबंधु, भास्करराव खोब्रागडे व शालिनी दुबे हे सल्लागार आहेत.

     या बानाई पतसंस्थेने योजिलेले सर्व उपक्रम व कृतीयोजन उत्तराकडे नेणारे आहेत. 

लोकसहभाग व शुभेच्छा निश्चितच अपेक्षित आहेत.

० रणजित मेश्राम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!