निवडणूक आयोगाने घेतली उन्हाची धास्ती;
मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात ठेवणार
उन्हाच्या ऐन तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे. वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला आहे.
खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रांवर ठेकण्यात येणार असून,
त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकार्यावर देण्यात आली आहे.
सातारा जिह्यात लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे.
निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वाताकरण तापू लागले आहे. दुसरीकडे ऐन उन्हाच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे.
सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांसाठी
दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. जिह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्याकश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व क्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य किभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व वैद्यकीय अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रांकर एक आशा व पाच मतदान केंद्रा पाठीमागे एक आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना पुरेशा औषध किटसह मतदाना दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवु लागला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवु लागला आहे. मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणार्या अधिकारी व कर्मचारी आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत