निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या, धाकतोडे महाराज लागले प्रचाराला


आनंदराज यशवंतराव आंबेडकर अर्थात अमरावती लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व संयुक्त रिपब्लिकन फ्रंटचे अधिकृत उमेदवार ज्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे व मतपत्रिकेतील नंबर ५ आहे त्यांचा प्रभाव एवढा प्रचंड वाढला आहे की, विविध जातीधर्माच्या मतदारांनी आनंदराज यशवंतराव आंबेडकरांच्या प्रचाराची धुरा स्वत:हून आपल्या खांद्यावर घेतली आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर राजखेड ता. दर्यापूर जि. अमरावती येथील जिजाऊ महिला मंडळाचे देता येईल. हे महिला मंडळ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणता येईल. या गावाच्या भेटीत अंबिका ताई कोल्हे व ऍड. संतोष कोल्हे यांच्या माध्यमातून जिजाऊ महिला मंडळाच्या एकूण ४२ महिलांशी चर्चा करण्याचा योग आला. या महिला मंडळाच्या सदस्यांमध्ये या गावात जेवढ्या जातीचे लोक आहेत त्या सर्वांचा समावेश आहे. बौद्ध व मुस्लिम हे तर आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेबांचे पायाभूत मतदार आहेत शिवाय हिंदू बांधव व भगिनी सुद्धा साहेबांच्या प्रचाराला लागले आहेत हे विशेष. आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सर्वसामान्य मतदारांवर तर पडली आहेच आहे; परंतु वारकरी संप्रदाय सुद्धा साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावीत झाला आणि हरिभक्त परायण धाकतोडे महाराज हे निडरपणे साहेबांचा जाहीर प्रचार करीत आहेत. राष्ट्र संत तुकडोजी महाराज, माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा व मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे व त्यासाठी त्यांनी आपली जात ‘कुणबी’ लिहिली पाहिजे याची सक्ती करणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वारसा असणारा हा जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून अख्ख्या भारतात प्रसिद्ध असून या जिल्ह्याला खासदार म्हणून शोभेल असाच चेहरा अमरावतीचे मतदार निवडून देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आंबेडकरी चळवळीशी गद्दारी करणारांच्या पार्श्वभागावर ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी कसून लाथ घातल्याने आंबेडकरी समूहामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातील कोरकू, गोंड, भिल्ल, बलई,राजगोंड,गवळी या आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या झोपड्यांपर्यंत आनंदराज यशवंतराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे नातू म्हणजेच रक्ताचे वंशज व विचाराचे वारस असल्याचा संदेश पोहचला असून त्याच्या श्रेयाचा फार मोठा वाटा ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा आहे; हे रिपब्लिकन सेनेने मान्य केले पाहिजे. एकंदरीत राजमाता मिराताई आंबेडकरांनी ‘आंबेडकरी चळवळीला सोन्याचे दिवस’ येण्याचे पाहिलेले स्वप्न साकार होण्याची नांदी म्हणजे अमरावती लोकसभेची निवडणूक आहे असेच म्हणावे लागेल.
श्रीपती ढोले
महाराष्ट्र प्रदेश सचिव
रिपब्लिकन सेना

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!