ज्यांच्यावर 70 हजार करोड च्या घोटाळ्याचे आरोप केले आता त्यांच्या पत्नीचा प्रचार करतात संघ भाजपा चे पदाधिकारी- संघ मेहनत घेत असल्याचे सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

पुणे : मोदींसह भाजपच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. आता त्याच अजित पवारांच्या पत्नीसाठी मतदान करा, असं मतदारांना सांगताना नैतिक अडचण होत नाही का, असा प्रश्न विचारला असता स्वयंसेवकांनी त्यांच्या मनातील कुचंबणा बोलून दाखवली. आम्ही मतदारांना कोणाला मतदाना करा ते सांगत नाही, फक्त जास्तीत जास्त संख्येने मतदान करा असं सांगतो” असं उत्तर स्वयंसेवकांनी दिलं.
स्वयंसेवकांनी शहरी आणि निमशहरी भागात लक्ष केंद्रीत केलं आहे. खडकवासला, भोर आणि पुरंदरमध्ये संघाचं प्राबल्य आहे. या भागात स्वयंसेवक घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना मत. सुनेत्रा पवारांना मतदान म्हणजे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, असा प्रचार स्वयंसेवकांकडून सुरू आहे. ‘माझ्या विजयासाठी स्वयंसेवक प्रचंड मेहनत घेत आहेत. मला बऱ्याच ठिकाणी ते पाहिलंय,’ असं सुनेत्रा पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत