वर्धा लोकसभा मतदार संघातील लोकांनी एकदा अवश्य वाचा..
दिनांक 26 एप्रिल 2024 ला देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे आपले अमूल्य मते त्यांना मागील दहा वर्षात विद्यमान खासदारांनी आणि त्यांचा पक्षातील आमदारांनी केलेल्या कार्याची व दिलेल्या आश्वासनाची दखल घेऊनच आपण आपले अमूल्य मत द्यावे ही विनंती.
१) दहा वर्षात बजाज चौकातील व सिंधी रेल्वे येथील उड्डाणपूल अजूनही पूर्ण झाला नाही ..सिंधी रेल्वे la तालुक्याचा दर्जा का मिळालं नाही??जाम चौरस्तचा १०० कोटीचा उड्डाण पूल कुणी खाल्ला??
२) हिंगणघाट शहरांमधील कलोडे चौक मध्ये अपघातात २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर मागचा वर्षी ३ महिन्यात उड्डाण पुलाचे काम सुरू करू असे सांगण्यात आले होते.नुसती फेका फेकी.. ते झाले नाही ..साधं भूमिपूजन सुद्धा झालं नाही
३) ह्या विज्ञान आणि टेक्नॉलॉजी cha युगात एक पण कॉलेज(शासकीय पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज)मागील १० वर्षात हिंगणघाट शहरात झाले नाही .२०१४ मध्ये इंजिनियरिंग कॉलेज आणू इतर कॉलेज आणू म्हणून मत मागितली पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेची फसवणूक केली.
४) मागील १० वर्षात वर्धा जिल्ह्यात ,हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात एक पण मोठा उद्योग स्थानिक आमदार खासदार आणू शकले नाही..त्यामुळे बेरोजगारी वाढ होऊन चोरी ,अवैध धंदे ह्यात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग फसत चाललेला आहे.ह्याला दोषी कोण???हिंगणघाट cha २८३ हेक्टर ची प्रस्तावित एमआयडीसी स्थापन करण्यात सतत अपयश येत आहे.दुर्लक्ष करीत आहे .मग उद्योग कशे येणार ? ह्याला दोषी कोण?
५) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले पण दर महिन्याला वर्धा जिल्ह्यात बारा शेतकरी आत्महत्या करतात आहे
६) भारत हा जगातील युवा देश आहे आणि या देशातील 83% युवक बेरोजगार आहेत …….आणि का?
७) विद्यमान खासदारांना बारा वर्षे विधानपरिषद दहा वर्षे लोकसभेचा अनुभव असून सुद्धा जिल्ह्यात रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाही .उच्चशिक्षित तरुणांचा आत्महत्या वाढल्या आहे.
८) स्मार्ट सिटी चे आश्वासन देण्यात आले पूर्ण झाले नाही ,अमृत योजने अंतर्गत प्रत्त्येक घरी २४ घंटे पाणीपुरवठा करू असे स्वप्न दाखविल्या गेले ते अपूर्ण
९) वर्धा जिल्ह्यातील सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे का? हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा सिंचन प्रकल्प कडे पूर्णपने दुर्लक्ष .
१०) खासदार स्वतः खेळाडू असून सुद्धा जिल्ह्यात त खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तराचे क्रीडा संकुल उभारू शकले नाही का? हिंगणघाट तालुक्यात कोणतेही क्रीडा स्टेडियम नाही.
११) दहा वर्षात वर्धा जिल्ह्यात अपराधिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे .
१२) वर्धा जिल्ह्यासाठी कुठलीही स्पेशल रेल्वे पुणे मुंबई दिल्लीसाठी देण्यात आली नाही का?हिंगणघाट cha १९ रेल्वे एक्स्प्रेस cha स्टॉप ६ वर आणण्यात आला ते पण हप्त्यातून एकदा ..हा एक अन्याय च आहे
१३) 2014 ला 4000 रुपये सोयाबीनचा भाव होता आजही तेवढाच आहे
१४) कापसाचे भाव 12 हजारावरून 7000 वर आले..
१५) ह्या जिल्ह्यातील खासदार मागील १० वर्षात एकदा पण शेतकऱ्यांचा प्रश्नावर लोकसभेत बोलले नाही…
१६) मागील १० वर्षात जिल्ह्यातील एकही आमदाराने विधानसभेत मोठ्या उद्योगाची मागणी केली नाही
१७) प्रत्त्येक रोड हे निकृष्ट दर्जाचे बनवल्या गेले ..विकासाचा नावावर मोठा प्रमाणात भ्रष्टाचार
१८) उच्च शैक्षणिक सुविधेत कित्तेक वर्ष पासून दुर्लक्षित असलेल्या विदर्भातील सगळ्यात मोठ्या
हिंगणघाट या तालुक्यात जनतेचा आंदोलना मुळे एक शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट cha पदरात पाडून घेतलं पण त्यात स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींना मागील ५ महिन्यापासून साधी जागा निर्धारित करू शकले नाही .बांधकाम तर दूरच राहाल.
१९) हिंगणघाट मधून मेट्रो ट्रेन धावेल हे स्वप्न गडकरी साहेब यांनी दाखवल होत. ते सुद्धा एक मोठा जुमला ठरला आहे.
वरील संवेदनशील प्रश्नांवर विचार करून आपण आपले अमूल्य मत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमर शरद राव काळे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला द्यावे ही विनंती.
आपला
वर्धा जिल्ह्यातील एक जागरूक नागरिक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत