धर्म कधी “खतरे मे” येतो

जेंव्हा एखादा दलीत घोडीवर बसतो तेंव्हा हिंदु खतरे मे येतो!!
मग त्या दलीताला गोळ्या घालुन धर्म वाचवला जातो
जेंव्हा एखादा दलीत सरपंच होतो तेंव्हा हिंदु खतरे मे येतो !!
मग त्या दलीताला चपलाचा हार घालुन हिंदु धर्म वाचवला जातो
जेंव्हा एखाद्या चौकात अण्णा भाऊचा पुतळा बसवला जातो तेंव्हा हिंदु खतरे मे येतो !!
मग तो पुतळा हटवुन हिंदु धर्म वाचवला जातो
जेंव्हा एखाद्या विद्यापिठाला बाबासाहेबांचे नाव द्यायचे असतो तेंव्हा हिंदु खतरे मे येतो !!
मग त्या वेळी दलीतांची घरी जाळन हिंदु धर्म वाचवला जातो
जेंव्हा एखादा मातंगाचे प्रेत हिंदु स्मशान भुमित जाळायला आणले जाते त्या वेळी हिंदु खतरे मे येतो !!
मग त्या प्रेताला सरणा सहीत हुसकावुन लावुन हिंदु धर्म वाचवला जातो
जेंव्हा एखादा रोहीत वेमुला पिएचडी चे शिक्षण घेतो तेंव्हा हिंदु धर्म खतरे मे येतो!!
मग धर्माचे ठेकेदार त्याला आत्महत्या करायला भाग पाडतात व हिंदु धर्म वाचवला जातो
जेंव्हा भारतातील 85% गरिब समाज आरक्षण मागतो तेंव्हा हिंदु खतरे मे येतो!!
मग सेव्ह मेरीट सेव्ह नेशन वाले समोर येतात व धर्म वाचवायचा प्रयत्न करतात ज्या दिवशी या देशातील आरक्षण व दलीतांचे स्वातंत्र्य संपेल खऱ्या आर्थाने हिंदु धर्म धोक्यातुन बाहेर येईल असे त्यांना वाटते!!!!!
✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत