एप्रिल महिना उजाडलाच नव्हे
भारत देशाचे नाव जरी समोर आले
तरी अख्या जगात तुझे नाव निघते
बुद्धाच्या देशातून आलेला विद्वान
शिकायला केंब्रिज विद्यापीठात
ग्रंथालय उघडायच्या वेळे पूर्वी
बाहेर घुटमळायचा कधी उघडणार म्हणून
संध्याकाळी वेळ संपली म्हणायचे सगळे
बाहेर निघ आता बंद करायचे आहे
ज्ञानाची भूख भागविण्यासाठी
किती हा तुझा खटाटोप चालायचा
दिवसभर कोटात ठेवलेला पावाचा तुकडा
अधून मधून कुरतडत असायचा.
त्या भीमाची आठवण होते अख्या जगाला
माणसांना माणसात आणायला
समतेची बाब जगा समोर मांडायला
स्वातंत्र्य, इथल्या तुडविल्या गेल्या लोकांना
कुठलाही भेद नको बंधुत्व भावाला
वाढविण्याचा जगासमोर आदर्श ठेवायचा
मिळविण्यासाठी अख्खं आयुष्य दिलं तेव्हा
म्हणून तर जग पाहतयं भारताकडे
एवढ्या जाती,धर्म, पंथ संप्रदायाचे लोक
हसत,खेळत,गुण्यागोविंदाने राहतात कसे.
घटना लिहण्यासाठी मातब्बर शोधले इथे
तुझ्याशिवाय कोणी नाही दिसले हे खरे
३९५ कलमांचे काम तीन वर्षात केले
पद,पैसा,सत्ता कधी दिसले नाही तुले
स्त्रियांचे हक्कापायी,न्यायापायी
हिंदू कोडबिला पायी राजीनामा दिले
खाणीत काम करतांना मजूर पाहिले
म्हणून त्यांच्यासाठी मजूर पक्ष सुरू केले
त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढत राहिले.
मूक माणसांना बोलतं करायचे होते
म्हणून मूकनायक साप्ताहिक चालविले
शिका,संघटित व्हा संंघर्ष करण्याचे
मंत्र तुम्ही सगळ्यांना देत राहिले.
बुद्ध,कबीर, शिवाजी फुले,शाहूंचे
जगण्याचे आदर्श सगळ्यांना दिले.
मातीतच सोने माणिक मोती असते
जुन्यात काही चांगले जगण्याचे सोने होते
म्हणून बुद्धांना तुम्ही आपलेसे केले.
इंग्रज हुशार होते म्हणून तर इथे आले
इथे विद्वान ,शूर वीर,देव, व्यापारी होते
तरी दिडशे वर्षे इंग्रज शासन करत राहिले.
भीमा लिहली तुम्ही चांगली राज्यघटना
म्हणून तर जगतोय आनंदात सगळे .
कवि अनाम डी
(दिलीपकुमार कसबे)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत