UPSC-MPSC :‘स्टार्ट अप इंडिया’ उपक्रम का सुरु करण्यात आला? भारत सरकारचा त्यामागचा उद्देश काय?

देशातील स्टार्ट अप उद्योगांना पुरक ठरणारे ‘स्टार्ट अप इंडिया’ हे अभियान १६ जानेवारी २०१६ पासून भारत सरकारद्वारे राबविण्यास सुरुवात झाली. या अभियानाचे ‘स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया’ असे घोषवाक्य आहे. या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नाविन्यता, शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे असे आहे. स्टार्टअप ही चळवळ तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त कृषी क्षेत्र, वस्तूनिर्माण उद्योग, आरोग्य सेवा तसेच शिक्षण अशा इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा लागू करण्यात आली आहे. तसेच ही योजना पहिल्या श्रेणीमधील शहरांशिवाय निम्न शहरी आणि ग्रामीण प्रदेशांसहितच दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमधील शहरांमध्ये देखील लागू करण्यात आलेली आहे.
स्टार्ट अप उद्योग कोणाला म्हणायचे?
DPIIT ने केलेल्या व्याख्येनुसार भारतामध्ये स्थापन झालेले उद्योग आणि असे उद्योग ज्यांची नोंदणी ही भारतामध्ये झालेली आहे, त्यांना स्टार्ट अप उद्योग असे म्हणता येईल. स्टार्ट अप उद्योग म्हणून ओळख प्राप्त करण्याकरिता काही निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे ते निकष पुढीलप्रमाणे :
१) भारतामध्ये स्थापन झालेल्या किंवा भारतात नोंदणी झालेल्या उद्योगाला पहिली १० वर्षे स्टार्टअप म्हणता येते. योजनेच्या सुरुवातीला हा निकष ५ वर्षे इतका होता, तर २०१७-१८ मध्ये यामध्ये सुधारणा करून हा निकष हा ७ वर्षे इतका करण्यात आला व परत १९ फेब्रुवारी २०१९ ला सुधारणा करून १० वर्षे इतका करण्यात आला.
२) ज्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ही १०० कोटी रुपयांच्या आत असेल त्याच उद्योगाला स्टार्टअप उद्योग म्हणता येईल. ही मर्यादा सुरूवातीला २५ कोटी रुपये इतकी होती.
३) तीव्र रोजगार निर्मिती व संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योगांना स्टार्टअप म्हटले जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत