शिवतारेंच बंड, बैठकी नंतर थंड ! लवकरच पत्रकार परिषद घेऊन करणार भूमिका स्पष्ट

बारामती : शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी निवडणुका जाहीर होताच बारामती लोकसभा निवडणुकीत “लढणार आणि जिंकणारच !” हा पवित्रा घेत पवार कुटुंबावर सतत टीकास्त्र सोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.
शिवतारे आणि पवार हा वाढता संघर्ष पाहता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत शिवतारेंची एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून विजय शिवतारे यांच्या तक्रारींचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीनंतर गुरुवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवतारे सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून लढण्याची घोषणा शिवतारेंनी केली होती. मात्र शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी शिवतारेंसोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली ज्यानंतर शिवतारेंची समजूत घालण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे अजित पवारांविरोधात शिवतारेंनी पुकारलेलं बंड आता थंड झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत