महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

शालेय पोषण आहारासाठी शासनाने अंडी पुरवावी .

गौतम कांबळे
राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

शालेय पोषण आहार योजनेसाठी सरकारने अंडी पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,शालेय शिक्षण विभागाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी /केळीचा समावेश करण्यसाठी नव्या पदार्थासाठी शासनादेश जाहीर केला. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेली अंडी दिली जातील अथवा अंडा पुलाव, बिर्याणी देण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, अशांना अंड्यांऐवजी केळी मिळणार आहेत. सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी निश्चित केलेला ५ रुपये दर कमी आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत ही प्रक्रिया राबवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परंतु सद्यस्थितीत एका अंड्याचा खर्च ग्रामीण भागात ७ तर शहरी भागात १० रूपये आहे . तरी आपणास विनंती शासनाने तालुकास्तरीय पोल्ट्री फार्मची नेमणूक करून शाळेस विद्यार्थी पटानुसार अंडी पुरवावीत किंवा प्रति विद्यार्थी १० रुपये अंडी खरेदी खर्च द्यावा .
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अनेक माहीती संकलनाचे ऑनलाईन काम रोज शाळा स्तरावर सुरू आहे . त्यामध्ये पुरेश्या साधन सामुग्री अभावी ऑनलाईन माहीती संकलनाचे काम वेळेत पूर्ण होत नाही .त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की प्रत्येक शिक्षकाला एक लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी .लॅपटॉप खरेदीसाठी पन्नास हजार रुपये शासनाने बिनव्याजी पुरवावेत तसेच इंटरनेट भत्ता पाचशे रुपये प्रमाणे प्रत्येक शिक्षकाला देण्यात यावा अशी मागणी पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्य सल्लागार दिगंबर काळे ,राज्य उपाध्यक्ष दादासाहेब साळवे राज्य प्रसिद्धीप्रमुख विनोद चव्हाण व राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!