आर्थिकभारतमुख्यपानशेतीविषयक

‘ड्रोन दीदी’ योजना काय आहे? 8 लाख रुपये अनुदान देणारी ‘ही’ योजना काय आहे?

नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
योजनेमुळे ग्रामीण महिलांना कमाईचं अतिरिक्त साधन मिळेल व शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल.”
ड्रोन दीदी योजना बद्दल माहिती…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्याबाबत घोषणा केली होती.
त्यानंतर पुढे नोव्हेंबर महिन्यात यासंबंधीच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि तिला नमो ‘ड्रोन दीदी’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार. ड्रोनच्या सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं, याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आर्थिक मदत कशी मिळेल ?
ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन व त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जवळपास 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार.पुरवतील. 2024 ते 2026 या कालावधीत महिलांना ड्रोन पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी 1261 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्याचं वय 18 वर्षं किंवा त्याहून अधिक असेल, अशा सदस्याची 15 दिवसांच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवडली जाईल. यात ड्रोन पायलटचं पाच दिवसांचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामांसाठी 10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!