जरंडेश्वर कारखाना मूळ मालकाला द्यावा या संदर्भात हायकोर्टात याचिका

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं व्यक्त केलेल्या निरीक्षणानं खळबळ उडाली होती .
ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यांशी संबंधित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी चार्जशीट दाखल केली होती. पुणे जिल्हा बँकेकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ८२६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र, त्या कारखान्याची कवडीमोल दरानं विक्री राष्ट्रवादीच्या नेत्याच्या निकटवर्तीयांना करण्यात आल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं होत आता तो .जरंडेश्वर कारखाना मूळ मालकाला द्यावा या संदर्भात हायकोर्टात याचिका केली आहे
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण काय आहे .
गुरु कमोडिटीनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखना लिलावात खरेदी केला होता. कर्ज थकल्यानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं कारखान्याचा लिलाव केला होता. लिलावात कारखाना खरेदी केल्यानंतर गुरु कमो़डिटीजनं जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनीकडे दिला होता. या कंपनीची मालकी स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे होती. या कंपनीची मालकी नॉन-कॉन एनर्जीज प्रा. लि., फायर पॉवर एनर्जीज प्रा. लि, शिवराज अॅग्रो इस्टेट, प्रा. लि. आणि सुजय अॅग्रो इस्टेट प्रा. लि. या कंपन्यांकडे होती. स्पार्कलिंग सॉइल प्रा. लि. कंपनीमध्ये काही काळ सुनेत्रा पवार संचालक होत्या.
ईडीनं या प्रकरणाची चार्जशीट दाखल करताना पवार यांचं नाव घेतलं नव्हतं. या प्रकरणात नेमका लाभ कुणाला झाला हे देखील नोंदवलं नव्हतं. चार्जशीटमध्ये या प्रकरणातील सहभागी व्यक्तींच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असं नोंदवण्यात आलं आहे. गुरु कमोडिटी, जंरडेश्वर शुगर मिल्स आणि सीए योगेश बगरेचा यांना या प्रकरणी समन्स जारी करण्यास सांगण्यात आलं आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना १९९९-२००० मध्ये सुरु झाला होता. त्यानंतर राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यात येत होतं. मात्र, त्यानंतर तो थकबाकीते केला. कर्जाची रक्कम आणि व्याज असे ७८.९ कोटींचं कर्ज कारखान्यावर होतं. गुरु कमोडिटीजनं कारखाना लिलावात २०१० मध्ये खरेदी केला. त्यानंतर त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पुणे जिल्हा बँकेने ८२६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं. जरंडेश्वर शुगर मिल लिलावात सहभागी होण्यास पात्र नसल्यानं त्यांनी गुरु कमोडिटीजकडून भाडेतत्त्वावर साखर कारखाना घेतला. जरंडेश्वर शुगर मिलनं गुरु कमोडि़टीला दिलेली ९९. ५ टक्के रक्कम स्पार्कलिंग सॉईलची होती.
या प्रकरणामध्ये आता जरंडेश्वर कारखानाच मूळ मालकाला द्यावा या संदर्भात हायकोर्टात याचिका केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत