खोटी साक्ष देऊन चांगलेच अडकले बाबा रामदेव; माफीनामा नामंजूर – सुप्रीम कोर्टाचे पतंजलीला जोरदार फटके.

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हलक्यात घेणाऱ्या पतंजलीच्या बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. यापूर्वी 3 वेळा तंबी देऊनही खोटी साक्ष देणे, माफीनामा कोर्टात सादर न करता प्रसार माध्यमात छापणे अशा गंभीर चूका केल्याबद्दल परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सज्जड दम सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
जातीयवादी शक्तींना, समविचारी सरकारांना हाताशी धरून आयुर्वेद आणि हिदुत्वाच्या नावावर सामान्य जनतेची खोट्या जाहिरातींनी दिशाभूल करून हजारो करोड रुपयांचे साम्राज्य उभा केलेल्या पतंजली ला आज सुप्रीम कोर्टाचा झटका काय असतो ते कळाले असेल.
ग्राहकांची दिशाभूल होत असताना बाबा रामदेव यांच्या पतंजली विरोधात इतके दिवस कोणतीही कारवाई न केल्याबद्दल कोर्टाने उत्तराखंड सरकारला ही चांगलच धारेवर धरलं. तसंच केंद्राने दाखल केलेल्या उत्तरावर आपण समाधानी नसल्याचं सांगितलं आहे. उत्तराखंड परवाना प्राधिकरणावर सुध्दा ताशेरे ओढले. तसंच तीन औषध परवाना अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे असं म्हटलं. “जेव्हा त्यांनी (पतंजली) तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचं उल्लंघन केलं, तेव्हा तुम्ही काय केलं? बसून बोटं मोडत होतात का? आम्ही तुम्हाला फटकारण्याची वाट पाहत आहात?” असा संतप्त सवाल न्यायमूर्ती कोहली यांनी केला.
16 एप्रिल रोजी च्या पुढील सुनावणीस बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढे काय कार्यवाही होते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत