नाना पटोले यांच्या गाडीला अपघात; नाना सुखरूप. – घातपाताची शक्यतेच्या दिशेने तपास सुरू.

भंडारा: 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. यात नाना पाटोले सुखरूप बचावले असले तरी मागे पुढे सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने घटनेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला आणि आरोप प्रत्यारोपन्ना उधाण आले आहे.
भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी या स्वगावी परत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. भंडाऱ्यावरुन पाच किलोमीटर अंतरावरील भीलवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली.
नानांना अथवा गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून कारवाईला सुरुवात केली. तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता असल्याची शंका उपस्थित केल्याने पोलीस ट्रक चालकाची कसून तपासणी करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत