जन आक्रोश एल्गार

मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणी करिता.
जनआक्रोश मोर्चा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या विविध मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला..
निवेदनातील प्रमुख मागण्याः
संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी.
गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
करून त्यांना सहआरोपी बनवावे.
दिवंगत कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य आणि पुनर्वसनाची तातडीने व्यवस्था करावी.
खटल्यासाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करून प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे.
आरोर्षीची मालमत्ता जप्त करण्यात यावी.
परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी जी निर्गुण हत्या करण्यात आली व बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी या दोन्ही घटनेतल्या आरोप यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी अकोल्यात सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख,त्यांचे कुटुंबीय तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई मोर्चात सहभागी होते.संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून,मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.तसेच,त्यांना अभय देणारे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विविध जाती-धर्मातील नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले या दोन्ही प्रकरणातील आरोप यांना जरी शिक्षण नाही झाली तर यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो..
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
सोमनाथ सूर्यवंशीला
न्याय मिळालाच पाहिजे..
संतोष देशमुख ला न्याय
मिळालाच पाहिजे..
गृहमंत्री होश में..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत