महाराष्ट्रमुख्यपान
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता.

आज सकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता नैऋत्य दिशेला आणखी वाढली असून त्याचं मिचौंग चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ नेल्लोर आणि मच्छिलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ओलांडून जाण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासात त्याचा प्रभाव वाढून ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रांत जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्यांचा वेग १०० किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत