देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक

जेएनयु मध्ये “जयभीम” चा नारा

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये यंदा इतिहास घडला. या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या पॅनलने उजव्या विचारधारेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) उमेदवारांना आसमान दाखविताना चारी मुंड्या चीत केले. नुकत्याच पार पाडलेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचे मतमोजणी रविवारी झाली. चार वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने साऱ्यांचे लक्ष जेएनयु कडे लागून राहिले होते.

झालेली निवडणूक 2024 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे वैचारिक लढाई होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत संघ भाजप जेएनयुवर कब्जा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना, 1)ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन 2)डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन 3)स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया 4) बिरसा-आंबेडकर-फुले स्टुडंट्स असोसिएशन या डाव्या विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्रित निवडणूक लढवून गुंडशाहीचा,धर्मांधतेचा, भांडवलशाहीचा,सनातनी ब्राम्हण प्रवृत्तीचा (अभाविपचा) पराभव केला.
एक नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे,यंदा महासचिव पदासाठी डाव्यांची संयुक्त उमेदवार स्वाती सिंह हिचे नामांकन मतदानाच्या काही तास आधी रद्द केल्यानंतर डाव्या आघाडीने आंबेडकरी – ओबीसी विचारांच्या ‘बिरसा-आंबेडकर-फुले स्टुडंट्स असोसिएशन’च्या (बापसा) प्रियांशी आर्य हिला ऐनवेळी पाठिंबा देण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. संघ-भाजपच्या विचारांशी जेएनयू मध्ये यशस्वी मुकाबला करणाऱ्या विद्यार्थी संघटनांची परिपक्वता महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी मोठा धडाच आहे.
यावेळी डाव्यांच्या संयुक्त आघाडीने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या धनंजय या दलित उमेदवाराला अध्यक्षपदासाठी उभे केले. धनंजयने २,५९८ मते मिळवत अभाविपच्या उमेश अजमेरा (१,६७६) याचा दणदणीत पराभव केला.
रविवारी जेएनयुच्या आवारात जयभीम आणि लाल सलाम चा नार्‍याने आसमंत दुमदुमला.
निवडणूक जिंकल्यानंतर रविवारी रात्री जेएनयुच्या आवारात केलेल्या भाषणामध्ये धनंजयने नेमके मुद्दे मांडले. “डाव्या विचारांचे लोक शहरी नक्षल, दहशतवादी, विभाजनवादी असल्याचा भाजप खोटा प्रचार करतो. पण आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहोत. गरिबांच्या मुलांना जेएनयूमध्ये स्वस्तात शिक्षण घेता यावे यासाठी संघर्ष करत आहोत. ग्रंथालय हे विद्यापीठाचा आत्मा असतो, पण तुम्ही ग्रंथालयाच्या निधीत 80 टक्के कपात केली आहे. अतिरिक्त जागा कमी केल्या आहेत. जे एन यु मध्ये शिक्षण घेण्याचे देशभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असते त्यांची स्वप्ने मारून टाकली जात आहेत.” हे धनंजय चे विजयानंतर चे भाषण कुठल्याही नेत्याच्या भाषणापेक्षा तगडे म्हणावे लागेल. 30 वर्षानंतर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी दलित उमेदवाराची निवड झाली ही अभिनंदन ही गोष्ट आहे 1996-97 मध्ये दलित समाजातील भट्टीलाल भैरवाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले होते. बिहार मधील गया येथील धनंजय जेएनयु मध्ये पीएचडी करत आहे. तर बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रियांशी आर्य हि महासचिव पदी निवडून आली. तसेच डाव्यांच्या आघाडीचे उपाध्यक्षपदी अभिजीत घोष एस एफ आय आणि सहसचिव पदासाठी मोहम्मद साजिद ए आय एस एफ विजय झाले.

डॉ. चंद्रशेखर भारती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!